Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime : धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोघांवर हल्ला

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्याच्या कारणावरून दोन युवकांवर फायटरने हल्ला करून मारहाण केल्याची घटना गुरुवारी (ता.१९) रात्री आठच्या सुमारास रिंगणगाव येथे घडली.

या मारहाणीत दोन युवक गंभीर जखमी झाले असून, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two were attacked for playing religious song jalgaon crime news)

रिंगणगाव (ता. एरंडोल) येथे रात्री आठच्या सुमारास रोहित रामदास मराठे (वय २०) दुर्गादेवी मंडळाजवळ बसला होता. दुर्गोत्सवात धार्मिक गाणे लावण्यात आले होते. त्यावेळी गावातील अरबाज रफिक खाटिक व मोईन मुखत्यार मणियार हे दोन युवक त्या ठिकाणी आले आणि रोहित याला अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ करू लागले.

मोईन मुखत्यार मणियार याने हातातील लोखंडी फायटरने रोहितच्या छाती व पोटात मारून जखमी केले. भांडणाचा आवाज एकूण रोहित याचा मामेभाऊ वैभव मराठे हा भांडण सोडविण्यासाठी आला असता त्यास देखील अरबाज खाटिक व मोईन मणियार यांनी मारहाण करून जखमी केले.

गावातील भूषण महाजन, अनिल महाजन यांच्यासह ग्रामस्थांनी वाद मिटवले. रोहित मराठे व वैभव मराठे यांना जखमी झाल्यामुळे त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले.

याबाबत रोहित मराठे यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलिस ठाण्यात अरबाज खाटिक व मोईन मणियार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार चंद्रकांत पाटील तपास करीत आहेत. दोन्ही संशयित मारहाण करून फरार झाले असून, गावात तणावपूर्ण शांतता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT