accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कासोद्याजवळ दुचाकींची धडक; 2 जणांचा मृत्यू

दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू तर महिला जखमी झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : येथून जवळच असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात असलेल्या ‘आयटीआय’जवळ भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन दोघांचा मृत्यू तर महिला जखमी झाली आहे.

ही घटना मंगळवारी रात्री घडली.(Two wheeler accident near Kasoda jalgaon news)

कासोदा येथून अमोल मांगीलाल भोई (रा. उत्राण) हा दुचाकीने (एमएच १९, डीई ४०५८) उत्राणकडे जात होता. त्याच वेळी निपाणेकडून वासुदेव गोरख पाटील हा त्याच्या दुचाकीवर (एमएच १९, डीके ६०८७) कासोद्याकडे येत होता.

दरम्यान, ‘आयटीआय’जवळ दोघा दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. दोघेही यात मृत्युमुखी पडले. यातील एका दुचाकीवर बसलेली अंतुर्ली येथील महिला जखमी अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

याबाबत कासोदा पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. १९) रात्री घटनेबाबत नोंद करण्यात करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रवींद्र पाटील हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET SCAM : नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट ! सीबीआयच्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचे कॉलेजकडून निलंबन

ITR Update: आयकर विभागाने जारी केले सर्व ITR फॉर्म! तुमच्यासाठी कोणता योग्य? ऑनलाइन रिटर्न कसा भराल? जाणून घ्या

Kerala CM VD Satheesan : कोण आहेत केरळचे नवे मुख्यमंत्री व्ही.डी. सतीशन? 'इतक्या' संपत्तीचे आहेत मालक...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटीचं प्रकरण तापलं, पुण्यात NSUI कडून आंदोलन, पोलिसांनी कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात

Pune Hospital: माणुसकीला काळिमा! पुण्यातील हॉस्पिटल वाद चिघळला, १३ तासांचे बिल ३.२५ लाख, मृतदेह रोखून धरल्याचा आरोप, राष्ट्रवादीचे नगरसेवक आक्रमक..

SCROLL FOR NEXT