Uddhav Thackeray esakal
जळगाव

Jalgaon Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या सभेची पिंप्राळ्यात जोरदार तयारी; जाणून घ्या दौरा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा रविवारी (ता. १०) जळगावचा दौरा निश्‍चीत झाला आहे. जळगाव येथे पिंप्राळा भागात होत असलेल्या त्यांच्या सभेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे.

श्री. ठाकरे यांच्या हस्ते पिंप्राळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, तसेच महापालिकेत लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचेही अनावरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पिंप्राळा येथील राष्ट्रीय महामार्गालगतच्या मैदानावर जाहीर सभा होणार आहे. (uddhav thackeray in pimprala on 10 september jalgaon news)

जळगावात त्यांच्या कार्यक्रमांच्या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे. याबाबत उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. तर, पिंप्राळा येथील मानराज पार्कजवळील मोकळ्या जागेत सभेची तयारी अंतीम टप्प्यात आहे.

या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी भव्य वॉटरप्रुफ तंबू उभारण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांचा जळगाव येथील दौरा कार्यक्रमही प्राप्त झाला आहे. त्यानुसार श्री. ठाकरे मुंबई येथून सकाळी साडेदहाला विमानाने जळगाव विमानतळावर पोचतील.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळी अकराला त्यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे व त्यानंतर दुपारी बारा वाजून पंधरा मिनीटांनी पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.

दुपारी एकला मानराज पार्कजवळील मैदानात जाहीर सभा व तेथून दुपारी अडीचला ते जळगाव विमानतळाकडे रवाना होतील. तेथून ते विमानाने मुंबईकडे रवाना होतील. त्यांच्यासमवेत खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, जिल्हा प्रमुख संजय सावंत उपस्थित असतील.

महापौर जयश्री महाजन, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपहापौर कुलभूषण पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख हर्षल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सभेची तयारी करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT