Volunteers while cleaning the court premises in an initiative organized by Gandhi Research Foundation and District Justice Authority in the Beautiful, Clean City campaign. esakal
जळगाव

Jalgaon News : ‘सुंदर जळगाव’ अंतर्गत न्यायालय परिसर स्वच्छ; 4 टन कचरा संकलित

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : येथील जिल्हा सत्र न्यायालय आवारात जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व गांधी रिसर्च फाउंडेशन यांच्यातर्फे महापालिकेच्या सहकार्यातून स्वच्छता अभियानासह जनजागृती करण्यात आली.

‘सुंदर, स्वच्छ आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेवर कार्य करण्याचा संकल्प न्यायालयीन सहकाऱ्यांनी केला. जवळपास ४ टन कचरा संकलित करून महापालिकतर्फे घंटागाडीद्वारे त्याची विल्हेवाट लावण्यात आली. (Under Sundar Jalgaon 4 tons of garbage was collected in court premises news)

सकाळपासून सुरू असलेल्या स्वच्छता उपक्रमात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एस. पी. सय्यद, कोर्ट व्यवस्थापक जगदीश माळी, अधीक्षक सुभाष पाटील, अश्विनी भट, प्रमोद पाटील, अविनाश कुळकर्णी, प्रमोद ठाकरे, हर्शल नेरपगारे, मनोज बन्सी, जावेद एस. पटेल, प्रकाश काजळे, जितेंद्र भोळे, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त उदय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र करंगे, रमेश कांबळे, अर्जुन पवार यांच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे मदन लाठी, हेमंत बेलसरे, सुधीर पाटील, तुषार बुंदे व स्वयंसेवक उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे अनिल जोशी, बाळू साबळे, देवेंद्र पाटील उपस्थित होते.

गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी स्वच्छता अभियानासह पर्यावरणाबाबत जनजागृती केली. प्लॅस्टिकचा कमीत कमी वापर करण्यासह गांधी रिसर्च फाउंडेशनच्या ‘सुंदर जळगाव, स्वच्छ जळगाव आणि हरीत जळगाव’ या संकल्पनेविषयी सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

स्वच्छ जळगावचा संकल्प

यावर न्यायालयीन सहकाऱ्यांनी माझे घर, वॉर्ड, शहर स्वच्छ ठेवण्याची आपली जबाबदारी असल्याचे सांगत, त्यावर कार्य करणार असल्याची ग्वाही दिली. नियमित स्वच्छता मोहिमेसाठी पाच ते सहा स्वयंसेवकांची एक टीम करण्याचा मानस या वेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

त्याला गांधी रिसर्च फाउंडेशनच्या स्वयंसेवकांचे मार्गदर्शन राहील. येणाऱ्या काळात नियमित शहराला स्वच्छ, सुंदर, हरित ठेवण्याचे उपक्रम राबविले जातील, असेही या वेळी सर्वांतर्फे जाहीर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT