yuvaranga  esakal
जळगाव

Yuvaranga 2022 : प्रहसन, विडंबनातून अनागोंदी कारभारावर ताशेरे; विद्यार्थ्यांनी उधळले कलारंग!

सकाळ वृत्तसेवा

फैजपूर (जि. जळगाव) : विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालय चार दिवसीय युवक महोत्सव (Youth Festival) ‘युवारंग २०२२’ ला आज सुरवात झाली.

एक नवीन जोश आणि अपेक्षा घेऊन खानदेशातील जळगाव, धुळे, नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातून १०१ महाविद्यालय आणि १४९० विद्यार्थी महाविद्यालयाच्या प्रांगणात दाखल झालेले आहेत. (university level inter college 4 day youth festival Yuvarang 2022 begins today jalgaon news)

यासर्व कलावंतांचे प्रतिनिधी म्हणून समूह प्रमुख प्राध्यापक, विद्यार्थी कलावंत, सहकलावंत सहभागी झाले आहे. आज पहिल्या दिवशी पाच रंगमंचावर कलावंतांनी त्यांच्यातील कलागुण सादर करून श्रोत्यांची मने जिंकून घेतली. रंगमंच एकवर विडंबन व प्रहसन नाटक एकूण २३ स्पर्धकांनी समूह सहभाग नोंदवला.

यात उत्साहात विडंबन आणि प्रहसन नाट्य सादर करण्यात आले. या नाट्य प्रकारात सामाजिक, धार्मिक, राजकीय, ग्रामीण, अंधश्रद्धा, सांस्कृतिक आणि शालेय आणि न्यायव्यवस्था कायदा व सुव्यवस्था अशा अनेक विभागात चाललेल्या अनागोंदी कारभारावर विडंबनात्मक व मार्मिक भाषेत नाट्य सादर केले. रंगमंच दोनवर भारतीय समूहगान कला प्रकार सादर करण्यात आला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

यात एकूण २३ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. रंगमंच तीनवर वक्तृत्व स्पर्धा समाज आणि माध्यमे' या विषयावर घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण स्पर्धक ७७ होते. रंगमंच ४ वर स्वर वाद्य व तालवाद्य यासाठी कला प्रकारात ९ समूह स्पर्धक व ताल वाद्यासाठी १२ समूह स्पर्धक असे एकूण २१ समूह सहभागी झाले होते.

रंगमंच पाचवर चित्रकला प्रकारासाठी आजादी का अमृत महोत्सव, रंगपंचमी, आवडता निसर्ग देखावा रेखाटन असे तीन विषय देण्यात आले होते. या स्पर्धेत ४२ स्पर्धक सहभागी झाले होते.

यानंतर दुपारी चारला अनुक्रमे प्रहसन नाट्य, भारतीय समूहगान, वक्तृत्व स्पर्धा, भारतीय शास्त्रीय वाद्यसंगीत (तालवाद्य), वक्तृत्व स्पर्धा, व्यंगचित्र अशा स्पर्धा यशस्वीपणे पार पडल्या. या सर्व स्पर्धांमध्ये सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील कलागुण सादर केली. या सर्व स्पर्धांना श्रोत्यांची भरभरून साद मिळाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT