Damage crop due to unseasonal rains  esakal
जळगाव

Unseasonal Rain Crop Damage : वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 312 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) झालेल्या वादळी पावसामुळे ३१२ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. यात केळी पिकाला सर्वाधिक फटका बसला असून, ३६१ शेतकरी बाधीत झाले आहेत. (Unseasonal Rain Crop Damage Damage of 312 hectares area in the district due to stormy rains jalgaon news)

जिल्ह्यात आसमानी संकटांची मालिका सुरूच आहे. उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी जोरदार वादळी पाऊस झाला. या पावसामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. पिकांचेही मोठे नुकसान झाले.

जिल्हा कृषी विभागातर्फे नुकसानीचा प्राथमिक अंदाज जाहीर करण्यात आला आहे. यात भुसावळ, यावल, चोपडा तालुक्यात पिके अक्षरशः उद्धवस्त झाली आहेत. या तिन्ही तालुक्यांत ३१२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

२२५ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले आहे, तर मका, ज्वारी, बाजरी कांदा या पिकांचेही नुकसान झाले. तीन तालुक्यांतील २६ गावांमधील ३६१ शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले आहेत. जिल्हा कृषी विभागातर्फे पंचनामे केले जात असून, अंतिम अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT