Unseasonal rain for hour Jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon Unseasonal Rain : तासभर बरसला अवकाळी पाऊस; संकुलांच्या तळघरात साचले डबके

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असलेल्या जळगाव शहरासह परिसरात शुक्रवारी (ता. २७) जोरदार पावसाने दाणादाण उडवली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधा उडाली, तर शहरात सुरू असलेल्या रस्ते डांबरीकरणावरही ‘पाणी’ फेरले. (Unseasonal rain for hour Jalgaon news)

यंदा ऐन उन्हाळ्यात पावसाने थैमान घातले आहे. जळगाव जिल्ह्यात काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे. जळगाव शहरातही गेल्या दोन- तीन दिवसांपासून अधूनमधून पावसाचे वातावरण तयार होत होते.

शुक्रवारी तासभर पाऊस

शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास आकाशात ढगांनी एकच गर्दी केली. मेघगर्जनेसह जोरदार पावसाला अचानक सुरवात झाली. त्याआधी वादळी वाऱ्यानेही थैमान घातले. पावसामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वाऱ्यामुळे विविध ठिकाणच्या स्टॉल्सवरील ताडपत्री, पडद्या उडून गेल्या. दुपारी साडेचारनंतर जोरदार पाऊस सुरू झाला. जवळपास तासभर पडलेल्या जोरदार पावसाने व्यापारी संकुलांच्या तळघरात पाणी साचले. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.

डांबरीकरण ‘पाण्यात’

अनेक वर्षांपासून शहरातील रस्त्यांची कामे रखडली आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेने नागरिक त्रस्त आहेत. काही महिन्यांपासून रस्त्यांचे डांबरीकरण मार्गी लागले. त्यात तीन दिवसांपासून काव्यरत्नावली चौक ते महाबळपर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेतले होते. शुक्रवारीही हे काम सुरू होते. मात्र, नव्यानेच झालेले हे काम आजच्या पावसामुळे ‘पाण्यात’ गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT