Jalgaon Municipal Corporation esakal
जळगाव

Jalgaon Municipality News : 7 लाख लोकसंख्येचा नगररचना विभाग अधिकाऱ्यांविना; जिल्हा नगररचना विभागाकडे धावाधाव

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Municipality News : जळगाव शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात नवीन भागात बांधकामे, नवीन एन.ए. होत आहेत. अशा स्थितीत शहराच्या विकास आराखड्यांना परवानगी देणारे महापालिकेच्या नगररचना विभागाला सरकारने अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली नसल्याने जिल्हा नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांकडे महापालिकेच्या अभियंत्यांना धावाधाव करावी लागत आहे.

शहरातील लोकसंख्या सात लाखांपर्यंत आहे. (Urban planning department of 7 lakh population without officer in jalgaon municipality news)

शहराच्या विस्तारात लगतची शेती एन.ए. होत असून त्याठिकाणी ‘प्लॉट' होत आहेत. त्यावर बांधकामे होत आहेत. या सर्व बांधकामांची आणि बांधकाम पूर्णत्वाची परवानगी महापालिकेच्या नगररचना विभागातर्फे देण्यात येते. मात्र त्यासाठी सरकारतर्फे महापालिकेसाठी नगररचनाकार व नगररचना सहाय्यक संचालक नियुक्त करण्यात आले असतात.

त्यांच्या स्वाक्षरी झाल्यानंतर परवानगीचे आदेश जारी होतात. परंतु महापालिकेत दोन्हीपैकी एकाही अधिकाऱ्यांची नियुक्ती सरकारने केली नाही. त्यामुळे नगररचना विभागातील कामकाज सध्या वाऱ्यावर सुरू आहे.

जिल्हा नगररचना सहाय्यक संचालकांकडे कार्यभार

महापालिकेचे सहाय्यक नगररचना संचालक के. पी. बागूल हे पाच महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या पदभार नगररचनानाकार अशोक करवंदे यांच्याकडे देण्यात आला. सर्व कामे व्यवस्थेत सुरू असताना सरकारने श्री. करवंदे यांची बदली पुणे येथे केली. त्यामुळे संपूर्ण नगररचना विभाग अधिकाऱ्यांविना आहे.

महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकारीपदाचा कारभार जिल्हा नगररचना सहाय्यक संचालक दिघेश तायडे यांच्याकडे आहे.त्यामुळे महापालिकेच्या सर्व फाइली मंजुरीसाठी त्यांच्याकडे जात आहेत. त्यांच्याकडे जिल्ह्याचा कारभार असल्याने त्यांना महापालिकेच्या नगररचना विभागात येण्यास वेळ मिळत नाही. अशा स्थितीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना फाईल मंजूर करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात जावे लागते.

महापालिकेच्या संबंधित बैठकी त्यांच्या कार्यालयात होत आहेत. नागरिकांना आपल्या बांधकाम आराखड्यात त्रुटी असल्यास त्यांच्या भेटीसाठी तिकडे जावे लागते. जळगाव महापालिकेच्या नगररचना विभागासाठी सरकारकडून केव्हा अधिकारी दिले जाणार आहेत, याबद्दल शहरवासीयांची पाच महिन्यांपासून प्रतीक्षा कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT