Accident News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : पायावरुन बसचे चाक गेल्याने भांडी विक्रेत्याचा कापावा लागला पाय; बसस्थानकात झाली दुर्घटना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्यावर बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा. फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला. ( utensil seller leg cut due to bus accident jalgaon news )

९ ऑगस्टला घडलेल्या या अपघातप्रकरणी बुधवारी (ता. १) रोजी बस चालकाविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भांडी विक्रीचा व्यवसाय करणारे सय्यद हिसामोद्दीन हे जळगाव बसस्थानकात आले होते.

फलाटावर ते जामनेर बसची वाट पाहत उभे असताना समोरून बस (एमएच १४ बीटी १९७६) थेट सय्यद यांच्या अंगावर आली. त्यात ते खाली पडले व बसचे चाक उजव्या पायावरून गेले. त्यावेळी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.

इथून भुसावळ येथे खासगी रुग्णालयात हालवण्यात आले. नंतर प्रकृती गंभीर असल्याने कुटुंबीयांनी त्यांना तेथून पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले. तब्येतीत सुधारणा न झाल्याने सय्यद यांचा उजवा पाय गुडघ्यापासून कापावा लागला.

दोन महिने वैद्यकीय उपचार घेतल्यावर सय्यद यांनी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार बसचालक सय्यद कमरोद्दीन सय्यद शमशोद्दीन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Rohit Pawar : एमपीएससी प्रशासनातील घोटाळा मुंढे बाहेर काढतील असा विश्वास

Water Supply : ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा! महापालिकेचे नवीन धोरण; सदनिकाधारकांना पाणी देणे बिल्डरला बंधनकारक

Latest Marathi News Live Update : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३.५१ लाख शेतकऱ्यांना दिलासा

Jammu Kashmir : पूंछमध्ये LoC जवळ मोठा स्फोट; लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मोहम्मद फैजानसह चौघांचा मृत्यू

IND A vs NZ A: न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारताच्या संघात मोठा बदल; रिषभ पंत बाहेर, तर २१ वर्षांचा खेळाडू घेणार जागा

SCROLL FOR NEXT