Varangaon Road Biodiesel Center Seal Action of Supply Department by order of Collector Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon News : वरणगाव रस्त्यावरील बायोडिझेल केंद्र ‘सील; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुरवठा विभागाची कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : भुसावळ- वरणगाव रस्त्यावरील ‘चाहेल ढाबा’वर सुरू असलेले बायोडिझेल विक्री केंद्र पुरवठा विभागाने सील केले आहे.

जिल्ह्याच्या हेल्पलाइनवर मिळालेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या आदेशावरून तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाने शुक्रवारी (ता. ३०) ही कारवाई केली.(Varangaon Road Biodiesel Center Seal Action of Supply Department by order of Collector Jalgaon Crime News)

या ठिकाणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता एक नोझल मशीन, टाकीमध्ये साडेपाच हजार लिटर बायोडिझेल आढळून आले.

त्याचे नमुने घेण्यात येऊन सर्व मशिनरी व पंप सील करण्यात आले आहे. या आधी कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्यात येत होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व अधिकार प्रांताधिकाऱ्यांना दिल्यामुळे या कारवाईचा प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे अहवाल पाठविण्यात आल्याचे पुरवठा अधिकारी अतुल नागरगोजे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातील ३००० शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार; ‘हे’ आहे मुख्य कारण; नववी-दहावीच्या वर्गांसाठी २० पट बंधनकारक, अन्यथा...

अग्रलेख : शेजारी ‘सख्खे’ होतील?

MS Dhoni ने स्वत:हून भारताचे कर्णधारपद सोडले नव्हते, तर...; तब्बल ९ वर्षांनी सिलेक्टर्सने उलगडलं रहस्य

Paneer Sandwich Recipe: लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा फेव्हरेट! 10 मिनिटांत तयार करा टेस्टी पनीर सँडविच

Tax Laws : ‘सीबीडीटी’च्या सूचनांना कायद्याचे बळ

SCROLL FOR NEXT