Farmers shipping bananas directly to Saudi Arabia.  esakal
जळगाव

Jalgaon Banana Crop : वरखेडेची केळी थेट सौदी अरेबियात! 200 क्विंटल शेतमाल रवाना

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : बदलत्या काळाला अनुसरून पिके घेऊन यशस्वी शेती करण्याच्या प्रयोगाला साथ मिळून वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील शेतकऱ्याने शेती परवडत नाही, हा समज धरून न राहता पिकवलेली केळी थेट इराण, इराक या आखाती देशात पोहचली आहे.

स्थानिक बाजारपेठेपेक्षा आखातात जाणाऱ्या केळीला अधिक भाव मिळत आहे. मुंबईच्या कंपनीकडून थेट बांधावरच केळी खरेदी करून ती मुंबईला नेऊन तेथे पॅकिंग करून आखातात रवाना होत आहे. (Varkhedi bananas are shipped to Saudi Arabia jalgaon news)

वरखेडे येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. संभाजी भाऊराव चौधरी यांनी सुमारे तीन एकर क्षेत्रावर जैन टिश्यू कल्चरची साडेचार हजार झाडांची लागवड गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये केली. केळीसाठी केलेल्या अथक परिश्रमाला आज यश मिळाले.

जैन टिशू कल्चर रोपाची लागवड केलेल्या केळीच्या बागेसाठी सुरुवातीपासून उत्कृष्टपणे नियोजन त्यांनी केले. परिपक्व झालेल्या केळीच्या कापणीला सुरूवात झाली. सुरूवातीला स्थानिक केळी व्यापाऱ्यांकडून केळी विकत घेतली. डॉ. चौधरी यांनी लागवड केलेली केळी दर्जेदार असल्याने भोपाळ येथील श्रीक्रिष्णा फूड कंपनीने त्यांच्याशी संपर्क साधला.

कंपनीने थेट चौधरी यांच्या शेताच्या बांधावर येऊन केळी खरेदीला सुरूवात केली. स्थानिक व्यापाऱ्यांपेक्षा दोनशे ते तीनशे रुपये जास्तीचा भाव त्यांना मिळाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री क्रिष्णा (एसके) फ्रूट कंपनीचे डिव्हिजनल मॅनेजर प्रमोद चौगुले व एरिया मॅनेजर तुषार चौधरी यांच्याकडून ही केळी खरेदी करून ती मुंबई वाहनाने नेऊन तेथून जहाजाद्वारे इराण, इराक या देशांमध्ये रवाना करण्यात आली. दोन दिवसात सुमारे दोनशे क्विंटल केळी वरखेडे येथून आखातात रवाना झाली.

शेती परवडत नाही म्हणून रडत कडत न बसता बदलल्या काळाचे भान ठेवून बाजाराचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी शेती मालाच्या विक्रीचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच आनंद येईल, असे शेतकरी डॉ. संभाजी चौधरी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

निर्यातक्षम केळीसाठी प्रोत्साहन

केळी महामंडळासाठी लवकरच महामंडळाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात केळी उत्पादकांना निर्यातक्षमकेळी पिकविण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT