आकाशवाणी चौकात सहाय्यक पोलिस अधीक्षकांनी थांबवलेल्या वाळू डंपरची वाहने esakal
जळगाव

पोलिस कारवाईमुळे वाळूमाफिया सैरभैर

रईस शेख्

जळगाव : गिरणा नदीपात्रातून बेकायदा उत्खनन करून शहरातून वेगवेगळ्या भागातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अचानक कारवाई करण्यात आली. सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः ही कारवाई करत शनीपेठ, जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलीसात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दाखल गुन्ह्यात नमुद केल्याप्रमाणे, जळगाव शहरातील भिलपूरा चौकात गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाने डंपर क्रमांक (एमएच १९ सी ३४२२) मधून वाळूची चोरटी वाहतूक करताना पोलीसांनी पकडले. या कारवाई डंपर चालक शेख रहीम शेख रऊफ (वय ३१, रा. आव्हाणे) यांच्यावर शनीपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दुसऱ्या कारवाईत आकाशवाणी चौकात विनाक्रमांकाचे तीन सुसाट डंपर स्वतः सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी थांबवून तपासणी केल्यावर बेकायदेशीर वाळू वाहतूक होताना निदर्षनास आले. पोलिस कर्मचारी फिरोज तडवी यांच्या फिर्यादीवरून देविदास नवल रायसिंग (रा. बांभोरी), प्रमोद भिमराव नन्नवरे (रा. बांभोरी ता. धरणगाव), सतिष लक्ष्मण महाजन (रा. शनीपेठ), संतोष शालक नन्नवरे (रा. बांभोरी), आणि ज्ञानेश्वर श्रावण नन्नवरे (रा. जळगाव) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या कारवाईत शहरातील शिवकॉलनी स्टॉपजवळील राष्ट्रीय महामार्गावर रामानंदनगर पोलीसांनी धडक कारवाई करत वाळू वाहतूक करणारे डंपर (एमएच १९ सीवाय ५९१५) पकडले. वाळू वाहतूकीचा कोणताही परवानगी नसल्याचे आढळून आल्याने पोलिस कर्मचारी नितेश बच्छाव यांच्या फिर्यादीवरून सैय्यद अशफाक सैय्यद शफी (रा. आव्हाणे) आणि अभय हरी परदेशी (रा. भडगाव) या दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास विकास महाजन करीत आहे.

यांच्यावर झाली कारवाई

डंपर क्रमांक (एमएच १९ सीवाय २६९४) प्रकाश सोनवणे, मालक भिला कोळी, (एमएच १९ झेड ४९७३) पवन सुनील पाथरवट, मालक- सुनील पाथरवट, (एमएच १९ झेड ४४२७) अनिल पवार, मालक- जयेश शहा, (एमएच १९ झेड ३३३६) देवीदास रोजस, मालक- प्रमोद नन्नवरे, (एमएच १९ बीएम ०७५७) चालक मालक सतीश महाजन, (एमएच १९ डीबी ७७८९) प्रल्हाद तायडे, मालक गजू गोरखेडे, (एमएच १९ सीवाय ३३८५) संतोष नन्नवरे, मालक- मयुर चौधरी, (डब्लुबी ७३ ई ५२५३) दिलीप पारधी, मालक- पप्पू पारधी (एमएच १९ एचजी २४७२) रवींद्र बारी, मालक- अजय चौधरी(एमएच १९ सीवाय ५९१५) सैय्यद अश्पाक सैय्यद रफि, मालक- अजय परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल होउन डंपर जप्त करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT