kbc north maharashtra university esakal
जळगाव

वंचित विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणार; चर्चेनंतर कुलगुरुंचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : खानदेशात विशेषत: धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील अतिवृष्टीने अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू न शकल्याने ते परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. याबाबत व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांनी कुलगुरु डॉ.व्ही.एल. माहेश्‍वरी यांच्याशी चर्चा केली. या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा (Re Examination) घेण्याचे कुलगुरुंनी त्यांना सांगितले. (Vice Chancellor north maharashtra university statement about re examination Latest Marathi News)

गेल्या तीन दिवसांपासून खानदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यातही धुळे व नंदूरबार.जिल्ह्यात अतिवृष्टी झाली असून अनेक रस्ते पुराच्या पाण्याखाली असल्याने गावांचा संपर्कही तुटला आहे. सध्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या पदव्युत्तर व अन्य अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु असून गावांचा संपर्क तुटल्याने त्या गावांमधील अनेक विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोचू शकलेले नाहीत.

याबाबत विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील यांना ही समस्या सांगितली. प्रा. पाटील यांनी यासंदर्भात कुलगुरु डॉ. माहेश्‍वरी यांच्याशी चर्चा करत वस्तुस्थिती विशद केली. त्यावर कुलगुरुंनी जे विद्यार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोचू शकले नाहीत, त्यांना त्या दिवसाचा संबंधित पेपर पुन्हा देण्याबाबत व्यवस्था करण्याचे आश्‍वासन दिले, अशी माहिती दिलीप पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT