Prafull Wankhede, Jayesh Pathade, Sharad Baviskar, Viraj Devang, Sudhir Suryavanshi, Somnath Nirmal esakal
जळगाव

Vidrohi Marathi Sahitya Sammelan: कथा अभिवाचन, परिसंवादासह सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी!

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात लेखक, कलावंत, विद्यार्थी नेते युवकांशी साधणार संवाद...

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : येथील १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात युवकांसाठी प्रेरणादायी असे वक्ते, लेखक विचारवंत, कलावंत, विद्यार्थी नेते, युवांशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधणार आहेत. श्रोत्यांसाठी ती एक मेजवानीच ठरणार आहे.

युवांसाठी कथांचे अभिवाचन, नाटक, एकांकिकांसह परिसंवाद, गटचर्चा, काव्य व गझल संमेलन, युवा रॅप सिंगरचे रॅप गीते, शैक्षणिक धोरणावर चर्चा यांसह सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असून, विविध विद्यापीठांमध्ये लढलेले विद्यार्थी कार्यकर्ते व लोकशाहीवादी कार्यकर्ते यांचा गौरव विद्रोहीच्या मंचावर करण्यात येणार आहे. (Vidrohi Marathi Sahitya Sammelan feast of cultural events including storytelling seminars jalgaon)

विद्रोही मराठी साहित्य संमेलनात ‘आसक्त’ प्रस्तुत’ मंटो की बदनाम कहानियाँ’ मंटोच्या निवडक कथांचे अभिवाचन होणार असून, मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजळ यांनी केला आहे. सुयोग देशपांडे याचे दिग्दर्शक आहेत. यात तृप्ती देवरे, मुक्ता कदम, अतुल जैन कलाकार असतील.

‘विद्रोहा’च्या मुख्य मंचावर सुप्रसिद्ध व सर्वाधिक खपाचे आत्मवृत्त ‘भुरा’चे युवा लेखक व तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांच्याशी साहित्य संवाद साधला जाणार आहे.

‘गोष्ट पैशापाण्याची’ या बेस्ट सेलर गाजलेल्या पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांच्याशी गप्पांचा कार्यक्रम होणार असून, यात सुप्रसिद्ध पत्रकार, लेखक ‘चेकमेट’कार सुधीर सूर्यवंशी संयोजन करतील. प्रसिद्ध यू-ट्यूबर नीतेश कराळे उर्फ कराळे गुरुजी सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील.

विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) कष्टकरी बहुजन विद्यार्थ्यांसाठी ‘नो एज्युकेशन पॉलिसी’ या विषयावर परिसंवाद होणार असून, यात प्रमुख वक्ते छात्रभारतीचे रोहित ढाले, ‘एएसएफआय’चे विराज देवांग, न्यू स्टुडंट्स ॲन्ड यूथ फेडरेशनच्या निहारिका, ‘एसएफआय’चे सोमनाथ निर्मळ, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे निशिकांत कांबळे, विद्यापीठ विद्यार्थी कृती समितीचे तुकाराम शिंदे असतील, तर अध्यक्ष प्रा. सुनील वाघमारे असतील.

रॅप कला प्रकाराचे सादरीकरण

सुप्रसिद्ध युवा रॅप गायिका माही जी, ‘बोल इन्कलाबी’ रॅप गीतकार सागर चांदणे यांचे रॅप कलाप्रकारातील गीत सादरीकरण लक्षवेधी ठरणार आहे.

याप्रसंगी वेगवेगळ्या विद्यापीठात जातीयवादी दडपशाहीविरोधात आंदोलन करणारे, प्रसंगी मारहाण झेलणारे, कधी उलट प्रतिकार करीत लढणारे पुणे, मुंबई, वर्धा, संभाजीनगर येथील विद्यार्थी नेत्या ‘एनएसवायएफ’च्या श्रावणी बुवा, ‘एसएफआय’चे सोमनाथ निर्मळ, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जयेश पठाडे, अमीर काझी (मुंबई), चंदन सरोज (वर्धा), विराज देवांग यांचा गौरव विद्रोहाच्या मुख्य मंचावर करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT