Vidrohi Marathi Sahitya Sammelan sakal
जळगाव

Vidrohi Marathi Sahitya Sammelan: अमळनेर येथे 3 फेब्रुवारीपासून विद्रोही मराठी साहित्य संमेलन

अमळनेर येथी धुळे रोडवरील आर. के. नगर समोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन होईल.

सकाळ वृत्तसेवा

Vidrohi Marathi Sahitya Sammelan : अमळनेर येथे ३ व ४ फेब्रुवारी होणाऱ्या १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशसंघटक श्याम पाटील यांची तर महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली आहे.

ही माहिती विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या राज्यध्यक्षा प्रा. प्रतिमा परदेशी व राज्यउपाध्यक्ष अर्जुन बागूल यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. (Vidrohi Marathi Sahitya Sammelan from February 3 at Amalner jalgaon news)

विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे मुख्य संयोजक धनदाई कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. लिलाधर पाटील, संयोजक साहित्यिक मिलिंद बागूल तर मुख्य समन्वयक युवा कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. अशोक पवार, करीम सालार असतील. निमंत्रक म्हणून अमळनेर अर्बन बँकेचे संचालक रणजित शिंदे असतील.

अमळनेर येथी धुळे रोडवरील आर. के. नगर समोरील कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्य नगरीत विद्रोही मराठी साहित्य संमेलन होईल. स्वातंत्र्य सेनानी सानेगुरुजी यांचा ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा मानवतावादी संदेश तसेच संविधानिक मूल्यांचा जतन करण्याचा संदेश विद्रोही साहित्य संमेलनाच्या मंचावरून देण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे, असेही यावेळी जाहीर करण्यात आले.

अमळनेर येथील विद्रोही मराठी साहित्य संमेलन सांस्कृतिक आणि राजकीय दहशतवादाला आव्हान देणारे कला, साहित्य आणि संस्कृती या क्षेत्रातील अभिव्यक्तीचे विचारपीठ म्हणून काम करेल. हे साहित्य संमेलन लोकशाही, समतावादी आणि स्वाभिमानी विचारांचा स्वीकार करते, असेही यावेळी सांगण्यात आले. अमळनेर विद्रोही स्थानिक समिती अध्यक्ष गौतम मोरे, लेखक कवी डॉ. सत्यजित साळवे, कोषाध्यक्ष बापूराव ठाकरे, राम पवार, सुरेश पाटील, सुरेंद्र पवार, दयाराम पाटील, लेखक बळवंत भालेराव, वसंत सपकाळे, प्रा. यशवंतराव मोरे, तुषार सावंत आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Double Decker Bus: पुणेकरांची स्वप्नपूर्ती! 'मनपा'च्या ताफ्यात डबल डेकर बस; 'या' मार्गांवर धावणार

OCD Explained: OCD म्हणजे फक्त स्वच्छतेशी संबंधित नाही! डॉक्टरांनी सांगितले ऑब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरचे खरे स्वरूप

Kannad News : चिकलठाणच्या गांधारी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून शेतकऱ्याचा मृत्यू; कन्नड तालुक्यातील घटना

Dashavatar: दशावतार चित्रपटात दाखवलेला तो 'राखणदार' कोकणात खरंच असतो का? काय आहे परंपरा?

Crime News : सिन्नरमधील वायर चोरी प्रकरणी दोघांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT