Mehrun Track No Vehicle Zone esakal
जळगाव

Vikrant Mishra Death Case : मेहरूणच्या ‘त्या’ जीवघेण्या ट्रॅकवर नियंत्रण नाहीच!

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कार रेसिंगच्या नादात तरुणाने एका चिमुकल्या सायकलस्वाराचा बळी घेतल्यानंतर मेहरूण तलावानजीकच्या ट्रॅकवर योग्य त्या उपाययोजना करण्याच्या बाता यंत्रणांनी मारल्या खऱ्या. मात्र महिना उलटल्यानंतरही काहीही झालेले नाही. हा ट्रॅक ‘नो व्हेइकल’ झोन असताना त्याचीही अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे शासकीय यंत्रणा आणखी एखाद्या बळीची प्रतीक्षा करतेय की काय, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गेल्या तीन आठवड्यांपूर्वी मेहरूण तलावाच्या पूर्वेकडील ट्रॅकवर दोन तरुणांच्या कार रेसिंगच्या नादात एकाने भरधाव कार चालवत सातवर्षीय विक्रांत मिश्रा या चिमुकल्या सायकलस्वाराला उडविले होते. या भीषण अघातात सायकल २० फूट उंच उडाली व मुलाचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर या प्रकरणात कारचालक तरुण अल्पवयीन असल्याने त्याच्या बापाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. त्याच्या अटकेसाठी व मेहरूण ट्रॅकवर वाहतुकीच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासठी आंदोलनही उभे राहिले. (Vikrant Mishra Death Case no control over deadly track of Mehrun Jalgaon News)

यंत्रणा उदासीनच

या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षकांनी या ठिकाणी पोलिस चौकीच्या प्रस्तावासह ‘नो व्हेइकल झोन’ अंमलबजावणीची ग्वाही दिली. मनपा प्रशासनाने बॅरिकेडिंगचे दायित्व स्वीकारले. मात्र, अपघात होऊन महिना लोटला तरी या ठिकाणी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.

आरटीओची गाडी फिरतेय

तलावालगत तिहेरी बाजूंकडील रस्त्यावरून वेगाने वाहन वापरू नये म्हणून उपप्रादेशिक परिवहनची गाडी या रस्त्यांवरून फिरताना दिसते खरी, मात्र ती तात्पुरती उपाययोजना आहे. ही गाडी येऊन गेल्यानंतर पुन्हा या ठिकाणी चारचाकी, दुचाकी भरधाव जाताना दिसतायत.

‘नो व्हेइकल झोन’चे काय?

या अपघातानंतर मेहरूण तलावानजीकच्या या रस्त्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या. या भागात जेव्हा प्लॉटचे ले-आउट झाले, त्यांना मंजुरी मिळाली तेव्हा नैसर्गिक स्रोताच्या लगतचा भाग म्हणून तलावालगतचा रस्ता ‘नो व्हेइकल झोन’ करण्यात आला. मात्र, इतक्या वर्षांत त्याची अंमलबजावणीच झाली नाही. त्यामुळे या ठिकाणी लहान-मोठे अपघात घडत असतात.

भावी जवानांचा जीव धोक्यात

मेहरूण तलावालगतच्या भागातील तसेच मेहरूण परिसर, रामेश्‍वर कॉलनी भागातील पोलिस व सैन्यभरतीची तयारी करणारे अनेक तरुण या रस्त्यावर रनिंग, व्यायाम करण्यासाठी येतात. अद्यापही रस्त्यावरून भरधाव चारचाकी वापरत असल्याने या भावी पोलिसांचा जीव त्यामुळे धोक्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाने या संदर्भात ग्वाही दिलेल्या सर्व उपाययोजना तातडीने राबवून हा परिसर अपघातमुक्त करावा, अशी मागणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT