Rajwad (Parola): Ex-MLA Shirish Chaudhary during the meeting of former MLA Krishibhushan Sahebrao Patil esakal
जळगाव

Jalgaon News : दोन दादांच्या भेटीने भुवया उचांवल्या!

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील आणि शिरीष चौधरी या दोन्ही माजी आमदारांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोघांमधून विस्तवही जात नाही, हे सर्वश्रृत असल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्र आणि राज्याप्रमाणे आपल्याही मतदारसंघात काही उलटफेर, यूती, आघाडीचे समीकरण तर नाही ना? असा प्रश्‍न अनेकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या भेटीने तर्कवितर्कांना ऊत आले आहे. (Visit of former MLA Krushibhushan Sahebrao Patil and Shirish Chaudhary meeting major happening in political happening Jalgaon News)

पालिकेच्या कार्यकाळ संपल्यानंतर कृषिभूषण पाटील यांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला आहे. अमळनेर मतदारसंघातील सार्वजनिक कार्यक्रमातही त्यांचा आता फारसा सहभाग दिसून येत नाही. ते कधी शिंदे गटात तर कधी भाजपत जाणार अशाही वावड्या उठतात. असो. दरम्यान, पाटील आणि चौधरी यांच्यामध्ये नेहमीच कुरघोडीचे आणि श्रेयवादाचे राजकारण पाहावयाास मिळाले आहे.

चौधरी हे बाहेरील जिल्ह्यातले आहेत हा पाटलांचा प्रचाराचा मुद्दा होता. त्यांच्या व्यवसायावरूनही त्यांना बरेच टार्गेट करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीत चौधरींचा ठरवून पाडाव करण्यात आला होता. तर चौधरींनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून नगराध्यक्षांसह नगरसेवकांना अपात्र करण्याचा मुद्दा मंत्रालयातून न्यायालयापर्यंत नेत पाटलांच्या डोक्यावर पाच वर्ष सतत टांगती तलवार कायम ठेवली होती. त्यामुळे पाटलांना सत्ता वाचविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती.

....इथं बनतो आपला लाडका तिरंगा

थोडक्यात म्हणजे या दोन्ही दांदांमधून विस्तवही जात नव्हता. असे असताना त्यांची झालेली भेट स्वाभाविकच संशोधनाचा विषय आहे. आगामी सहकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दृष्टिक्षेपात आहेत. आमदार अनिल पाटील आणि कृषिभूषण पाटील यांच्यातही सबकूछ आलबेल असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे या भेटीचा वेगवेगळ्या दृष्टीकोनातून जो- तो विचार करत तर्कवितर्क लढवत आहे. दोघं दादांमध्ये दीर्घवेळ चर्चा झाली. मात्र, चर्चेचा विषय काय हे मात्र त्यांनी गुलदस्त्यातच ठेवल्याने गौडबंगाल वाढले आहे.

"कृषिभूषण पाटील यांची तब्येत मागे ठिक नसल्याचे समजले होते. त्यांच्या ख्यालीखुशालीसाठी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजवड येथे मी त्यांची भेट घेतली. तुमची गरज असून, पुन्हा सक्रिय व्हा, अशी आर्जव मी त्यांना केली."

- शिरीष चौधरी, माजी आमदार, अमळनेर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

योजनांना पात्र, तरीही कर्ज मिळेना; उपचाराअभावी मुलगा गमावला, चित्रकार मंत्रालयासमोर करणार 'अर्ध नग्न लक्षवेधी चित्र' आंदोलन

Latest Marathi News Live Update : पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज; उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाची शक्यता

Coldrif Syrup : मध्य प्रदेश-राजस्थानमध्ये मृत्यूंनंतर 'कोल्ड्रिफ सिरप'वर महाराष्ट्रात बंदी

Raju Shetti:'अन्यथा मुख्यमंत्र्यांना दिवाळी करू देणार नाही': माजी खासदार राजू शेट्टी; शेतकऱ्यांवर गंभीर संकट, मुख्यमंत्र्यांकडून दिशाभूल

SCROLL FOR NEXT