Jalgaon Market Committee election esakal
जळगाव

Jalgaon Market Committee Election : संचालकपदासाठी आज मतदान

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समितींच्या संचालकपदांसाठी शुक्रवारी (ता. २८) मतदान होणार आहे. २१६ जागांसाठी उमेदवारांच्या भाग्याचा फैसला मतपेटीत बंद होणार आहे. (Voting for posts of directors of 12 agricultural produce market committees in district will be held on today 28 april jalgaon news)

शनिवारी (ता. २९) सहा, तर रविवारी (ता. ३०) सहा बाजार समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील जळगाव, रावेर, भुसावळ, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर, धरणगाव, यावल, बोदवड, पाचोरा व अमळनेर या बाजार समित्यांच्या संचालकपदांसाठी मतदान होणार आहे.

तालुक्यात मतदान केंद्राची जय्यत तयारी झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रांवर कर्मचारी तैनात झाले आहेत. एका मतदाराला १८ मतदान करण्याचा अधिकार आहे. सर्व १२ बाजार समितींच्या १८ संचालकांच्या २१६ जागांसाठी मतदान होणार आहे. सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ होणार असून, सायंकाळी पाचपर्यंत मतदानाची वेळ असेल.

जळगाव बाजार समितीसाठीही तयारी

जळगाव बाजार समितीच्या १८ जागांसाठी शुक्रवारी मतदान होईल. त्यासाठी जळगाव शहरातील नूतन मराठा महाविद्यालयात तीन ठिकाणी केंद्रे आहेत, तर कानळदा, सावखेडा, उमाळा, वावडदे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मतदान केंद्रे आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी के. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रांवर तयारी झाली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

शनिवारी, रविवारी मतमोजणी

बारा बाजार समित्यांच्या निवडणुकीची मतमोजणी एकाच दिवशी होणार नाही, तर सहा- सहा बाजार समित्यांची मतमोजणी शनिवारी (ता.२९) व रविवारी (ता. ३०), अशी दोन दिवस होणार आहे. शनिवारी भुसावळ,रावेर, चोपडा, चाळीसगाव, पारोळा, जामनेर बाजार समित्यांची, तर रविवारी धरणगाव, यावल, बोदवड, पाचोरा, अमळनेर, जळगाव बाजार समित्यांच्या निवडणुकांची मतमोजणी होईल.

दिग्गजांच्या वर्चस्वाची कसोटी

जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांच्या वर्चस्वाची कसोटी आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर सहकार क्षेत्रातील ग्रामीण पातळीवरील या पहिल्याच निवडणुका होत आहेत. बहुतांश बाजार समितीत शिवसेना (उद्धव ठाकरे गट), कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप- शिवसेना शिंदे गट यांच्यात लढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील कोंढवामध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी ४८ तासांत अटक

SCROLL FOR NEXT