DYSP News
DYSP News esakal
जळगाव

Jalgaon News : राजकीय इच्छेअभावी जळगावला आयपीएस DYSPची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्या‍चे मुख्यालय असलेल्या जळगाव शहरातील वाढती गुन्हेगारी, खून, दरोडे, बलात्कार, दंगलींसह अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळविण्यासह पोलिसांचा वचक कायम राखून खाकीचा दबदबा निर्माण करण्यासाठी जळगाव भागसाठी आयपीएस डीवायएसपींची गरज आहे. असे असताना गेल्या अडीच महिन्यांपासून उपअधीक्षकपदाची जागा रिक्त आहे.

या जागेसाठी चाळीसगाव अपर अधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी प्रयत्नही करून बघितले. मात्र तांत्रिकदृष्ट्या ते अशक्य असल्याने आणि राजकीय इच्छाशक्तीच नसल्याने त्यांचे जळगावचे स्वप्न पूर्ण झाले नाही. तर जळगावसाठी डायरेक्ट डीवायएसपी (राज्यसेवा) आणण्याचा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. (Waiting for IPS DSP to Jalgaon due to lack of political will jalgaon news)

जळगाव उपविभागत कार्यरत तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांची ‘ऑक्टोबर एंड’लाच बदलीची तयारी झाली होती. त्यांची गडचिरोली येथे बढतीवर बदली झाल्यापासून जिल्ह्यात सर्वांत व्यस्त डिव्हीजन असलेल्या जळगाव उपविभागाचा पदभार सद्या गृहविभागाचे उपअधीक्षक संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

तत्पूर्वी आयपीएस कुमार चिंता असताना गुन्हेगार आणि अवैध धंद्येवाईकांमध्ये कारवाईची चिंता कायम होती. मराठी-हिंदी दोन्ही भांषाची अडचण असताना चिंता यांनी आपला कार्यकाळ चांगल्याच पद्धतीने गाजवला. दोन्ही भाषांना आत्मसात तर केलेच त्यासोबत त्यांना अहिराणी भाषेची गोडी लागली होती. जळगावची गुन्हेगारी नियंत्रणात येत असतानाच त्यांची बदली झाली. चिंता यांच्या २४ महिन्यांच्या कार्यकाळात जळगाव उपविभागात ख्यातनाम अवैध व्यावसायिक-गुंड, गुन्हेगार शांत बसून होते.

सहा पोलिस ठाण्याचा प्रभाग असलेल्या जळगाव शहरात कुठलाही गुन्हा घडला तर प्रभारी अधिकाऱ्याच्या अगोदर कुमार चिंता घटनास्थळावर हजर रहायचे. प्रत्येक गुन्हा स्वतःच हाताळायला घेत असताना संशयित अटकेपासून ते दोषारोप पत्र दाखल करण्यापर्यंतत त्याचा पाठपुरावा स्वतः घेत असल्याने पोलिस ठाण्यातील क्राईम रायटर, डीबी कर्मचारी, गोपनीय विभागासह जनरल ड्युट्याचे कर्मचारीही सावधान मुद्रेतच ड्युट्या करत होते.

मात्र गेल्या महिन्यात त्यांची बदली झाल्याने अवैध व्यावसायिकांनी व त्यांच्यावर उपजीविका चालविणाऱ्या कलेक्शन पोलिसांनी नो चिंताचा झेंडा हाती घेत जळगाव प्रदेश बळकावला आहे. जुने स्टॅण्डच्या लॉटरी गल्लीत धडकनच्या खुनाचा थरार असू द्यात नाही तर स्टेटबँके जवळील गोळीबाराची घटना निर्जीव पोलिंगमुळे सामान्य माणसाला भय निर्माण झाले आहे. नित्याचे चाकूहल्ले, वाढत्या घरफोड्या, गल्लोगली अवैध धंदे आणि गुन्हेगारांचा हैदोस यावर नियंत्रणाची अपेक्षा समान्याकडून व्यक्त होत आहे.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

प्रभारींना गस्त माहितीच नाही!

जळगाव उपविभागात शहर- शनीपेठ, रामानंद आणि एमआयडीसी यांसारखे संमिश्र लोकवस्तीचे आणि गुन्हेगारी पोषक हद्दीचे पोलिस ठाणे आहेत. उपविभागात सर्वच सहा पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे एकदिवसा आड ठरलेलच आहेत. असे असताना पोलिस गस्तीचा पुरता बोजवारा उडाला आहे. त्यात साहेबांचे माणसं (कलेक्शनवाले पोलिस) आणि गुन्हे शोध पथक रात्री गस्त करण्यास धजावत नाही. एकटा चालक वायरलेस घेऊन अस्थापनाही बंद करतो. साहेबांची( प्रभारी) गस्तही करून घेतो. आठवड्याची डिव्हीजन गस्त केली तर केली अशी परिस्थिती आहे. या प्रभारींवर कुणाचेही नियंत्रण नसल्याची सद्यःपरिस्थिती आहे.

जळगावच्या पदरी निराशा

जळगाव भागसाठी खमक्या अधिकारीच नसल्याने प्रभारी अधिकारी आणि सुसाट पोलिस कर्मचाऱ्यांवरील नियंत्रण सुटल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, चोऱ्या, घरफोड्यांसह खून-प्राणघातक हल्ले, दंगलीचे प्रकारासह अवैध धंदेवाईकांना मोकळेरान मिळाले आहे. प्रगतिशील शेतकरी कुटुंबातून आलेले उच्चशिक्षित, तसेच अभियांत्रिकी विद्या शाखेचे पदविधर अभियसिंग देशमुख यांच्याकडे जळगावचा पदभार यावा, अशी जरी अनेकांची इच्छा असली व पोलिस खात्यातही तशी चर्चा असली तरी राजकीय इच्छाशक्तीपोटी जळगावच्या पदरी निराशाच येईल, अशीच परिस्थिती आहे.

अभय न मिळाल्याने...

कुमार चिंता यांची बदली झाल्याने रिक्त जागेसाठी चाळीसगाव अपर पोलिस अधीक्षक पदावर नुकतेच नियुक्त आयपीएस अधीकारी अभयसिंह देशमुख यांनी प्रयत्न करून बघितले. जळगाव भागची संपूर्ण माहितीही घेतली, खात्यातील अधिकाऱ्यांची त्यांच्या नावासाठी हरकतही नव्हती. मात्र, गृहमंत्रालयात सरशी असलेले जामनेर नरेशांनी अगोदरच जळगाव भागसाठी वेगळे नाव सुचवले आहे. तर पालकमंत्र्यांचीही नव्या नावासाठी संमती असल्याने आयपीएस अभयसिंह यांना मात्र अभय मिळू शकला नाही.

लगोलग बदली होत नाही

आयपीएस अधीकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय वरिष्ठ पातळीवर हेात असतात. अभयसिंह देशमुख नुकतेच दोन महिन्यांपूर्वीच रुजू झाले आणि त्यांनी चाळीसगाव अपर अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यांची पुन्हा बदली करून जळगाव नियुक्ती मिळणे, हे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. पदभार घेतल्यानंतर एका जागेवरून लगोलग बदली होत नाही.

- चंद्रकांत गवळी,अपर अधीक्षक (प्रभारी पोलिस अधीक्षक)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satwiksairaj Rankireddy Chirag Shetty : सात्विक - चिराग जोडीनं थायलंड ओपनची गाठली फायनल

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूक का लढवली नाही? कारण आलं समोर

किर्झिगस्तानमध्ये हिंसाचार! स्थानिक लोकांकडून पाकिस्तानसह भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य; परराष्ट्रमंत्र्यांनी घेतली दखल

Latest Marathi News Live Update : मुलुंड घटनेप्रकरणी आरोपींना एक दिवसाची कोठडी

SCROLL FOR NEXT