जळगाव

बोदवडला भीषण पाणीटंचाई; वीस दिवसाआड पाणी

अमोल अमोदकर

बोदवड  : उन्हाळ्याची सुरवात होत नाही तोच जळगाव जिल्ह्यात अनेक गावांना आतापासून पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत आहेत. त्यात बोदवड शहराला भीषण पाणी टंचाई जाणवत आहे असून नागरिकांना वीस दिवसाआड पाणी मिळत आहे.

 बोदवड शहरातील पाणी टंचाई लक्षात घेता आमदार चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेमुळे ओडीए जलवाहिनीचे काम युद्धपातळीवर सुरू असून, काही तांत्रिक अडचणींमुळे शहरासह तालुक्यात पाणीपुरवठा लांबणीवर पडला आहे. उन्हाळा सुरू होताच शहरात वीस दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांना पाण्यासाठी रनरण फिरावे लागत आहे. 

पैसे मोजावे लागत आहे

पाण्यासाठी नागरिकांना पाचशे रूपये टँकर तर वीस रूपयांत पाणी जार घ्यावा लागत असून, नागरिकांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचते आहे.

लोकप्रतिनीधी कडून टँकरने पाणीपुरवठा

या परिस्थितीत गटनेते कैलास चौधरी यांनी आपल्या दहा प्रभागासह परिसरातील भागात आतापर्यंत ३० टँकरने पाणीपुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला आहे. टँकर परिसरात गेल्यावर नागरिकांना दोनशे लिटर पाणी टाकी रांगेत भरून दिली जाते. यामुळे गर्दी होत नाही आणि पाणी व्यवस्थित भरले जाते, तसेच बोदवड नगरपंचायतने याच आठवड्यात २५ लाख रूपयांचा धनादेश ओडीए योजनेकडे दिला आहे. तर पाण्याचा कर भरूनही शहरातील नागरिकांना पाण्यासाठी गरगर फिरावे लागते. ओडीए जलवाहिनीचा तांत्रिक बिघाड जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा केला जाणार आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Kills Couple : कोल्हापुरात ऐन दिवाळीत धक्कादायक घटना, बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध दांपत्य ठार

Flower Farming : भारताच्या फूल शेतीने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उमटवला मोहोर! एका वर्षात ₹७४९ कोटींचे परकी चलन

Latest Marathi News Live Update : जळगावात रिक्षाचा अपघात, चंद्रकांत पाटलांकडून मदत

Diwali 2025 Dudget Gadget Gifts: नातेवाईकांना द्या बजेट फ्रेंडली 'ही' 4 गॅझेट्स; दिवाळी होईल आनंददायी

IND vs AUS 1st ODI Live: टीम इंडियाला अक्षर पटेल, लोकेश राहुलने दिला आधार; २६ षटकांच्या सामन्यांत ऑसींसमोर 'इतके' लक्ष्य

SCROLL FOR NEXT