crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : बसमध्ये चढताना महिलेची दीड लाखांची पोत लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील बस स्थानकावर भडगाव येथे घरी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दीड लाख रुपये किमतीची २५ ग्रॅम सोन्याची पोत अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना गुरुवारी (ता. १६) दुपारी सव्वावाजेच्या सुमारास घडली.(While boarding bus women jewellery was stolen jalgaon crime news )

भडगाव येथील गृहिणी कल्पनाबाई दिलीप तोतले (वय ६०) या आपल्या घरी जाण्यासाठी मानराज पार्क (जळगाव) येथून दुपारी बाराच्या सुमारास निघाल्या. दुपारी पाऊण वाजता एरंडोल बस स्थानकावर त्या उतरल्या.

तेथून भडगाव जाण्यासाठी सव्वावाजता चाळीसगावमार्गे नाशिक बस आली. गाडीत चढणाऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी कल्पनाबाई तोतले यांच्या गळ्यातील २५ ग्रॅम सोन्याची सुमारे दीड लाख रुपये किमतीची पोत लंपास केली.

कल्पनाबाईंनी एस. टी.त बसल्यानंतर गळ्याला हात लावला असता त्यांना सोन्याची पोत मिळून आली नाही म्हणून त्यांनी आरडाओरड केली. सर्व प्रवाशांना विचारपूस केली.

मात्र, सोन्याची पोत मिळून आली नाही. एरंडोल पोलिस ठाण्यात कल्पनाबाई तोतले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक सतीश गोराडे मार्गदर्शनाखाली हवालदार विलास पाटील हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT