Wife gone hometown husbands suicide in front running train Jalgaon News esakal
जळगाव

पत्नी गेली माहेरी; पतीने घेतली रेल्वेसमोर उडी

रईस शेख

जळगाव : दुचाकी रेल्वे रूळावर लावून ३५ वर्षीय तरुणाने बुधवारी (ता. २०) धावत्या रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही. किरण पांडुरंग मिस्तरी (वय ३५, रा. व्यंकटेशनगर, हरिविठ्ठल नगर, जळगाव) असे मृताचे नाव आहे.

किरण मिस्तरी फर्निचरचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. रविवारी (ता. १७) त्यांच्या शालकाचे लग्न असल्याने पत्नी मुलांसह माहेरी गेली होती. शालकाच्या लग्नाला हजेरी लावून पत्नी व मुलांना तेथेच सोडून किरण जळगावला परतला. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी (एमएच १९, बीव्ही २८३९) पलोड शाळेजवळील रेल्वे बोगद्याजवळ रस्त्यावर लावून दिली. रेल्वे रूळावरील रेल्वे खांब क्रमांक (४१४ च्या ३-५ दरम्यान) धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक लिलाधर महाजन यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा केला. दुचाकीच्या क्रमांकावरून मृताची ओळख पटली. पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. पोलिस नाईक लिलाधर महाजन तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT