Katole esakal
जळगाव

कटुर्ले, अंबाडी, शेवग्यासह बरेच काही! आरोग्यसाठी वरदान रानभाज्यांची हिरवळ

रानभाज्या निरोगी स्वास्थ्यासाठी एक वरदान आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : रानभाज्या निरोगी स्वास्थ्यासाठी एक वरदान आहे. रानभाजी व त्याचा उपयोग आपल्या दैनंदिन आहारात असायला हवा. शेतकऱ्यांसाठी या पद्धतीने महोत्सव भरविण्याचा आम्ही मागील तीन वर्षांपासून प्रयत्न केला आहे. यापुढेही शेतकऱ्यांसाठी नेहमी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी जिल्हा प्रशासन सहकार्य करेल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

शहरात कृषी विभाग, प्रकल्प संचालक (आत्मा) जळगाव व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्यातर्फे बायलॉजिस्ट आयडियल ऑर्गनायझेशनच्या सहकार्याने एकदिवसीय रानभाजी महोत्सव झाला. त्याच्या उद्‌घाटनावेळी ते बोलत होते.

महोत्सवात जळगाव जिल्ह्यातील ५० शेतकरी व शेतकरी गटांनी विविध रानभाज्या व रानभाज्यांची पाककला शहरातील नागरिकांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.

डॉ. दीक्षा पाटील यांनी पर्यवेक्षण करून शेतकरी व शेतकरी गटांची निवड केली. या महोत्सवात रावेर तालुक्यातील गारखेड्यापासून ते चाळीसगाव तालुक्यातील पिंपरीपर्यंत शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. महोत्सवात रानभाज्या म्हणजे कटुर्ले, अंबाडी, शेवगा, हादगा, केळफूल, गवती चहा, करवंद, भोकर, कोरडे, काटेमठ, फांग, अंबाडी, शतावरी, पाथरी, सुरण, तरोटा, बांबू कंद आदी रानभाज्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या.

आमदार सुरेश भोळे, महापौर जयश्री महाजन, नाशिक विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, उपवनरक्षक विवेक हौसिंग, जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, प्रकल्प उपसंचालक अनिल भोकरे, प्रकल्प उपसंचालक कुर्बान तडवी, कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सुखवानी, सचिव विवेक काबरा, प्रकल्पप्रमुख योगेश भोळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, महोत्सवात शेतकऱ्यांनी अंदाजे ८.२० क्विंटल रानभाज्यांची विक्री केली. त्यातून ८९ हजार ४०० रुपयांची उलाढाल झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT