Winter esakal
जळगाव

Winter Cold : उत्तर महाराष्ट्रात वाढणार हुडहुडी; थंडीच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : डिसेंबर सरल्यानंतरही न जाणवत असलेल्या थंडीने जानेवारीत कहर केला आहे. येणाऱ्या ४८ तासांत उत्तर महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट येणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारसह नाशिक जिल्ह्याला याबाबत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

गेल्या आठवडाभरापासून उत्तर भारतात थंडीचा प्रकोप वाढला असून, उत्तरेकडून गार वारे वेगाने वाहत आहेत. उत्तरेकडील राज्यांमध्ये बर्फवृष्टीही होत असून, दिल्लीचे तापमान १ अंशांपर्यंत खाली घसरले आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात विशेषत: उत्तर महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला आहे.

हेही वाचा: योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

उत्तर महाराष्ट्राला इशारा

हवामान खात्याने रविवारी (ता. ८)च १५ जानेवारीपर्यंत थंडीचा प्रकोप राहील, असा अंदाज वर्तविला होता. त्यात सोमवारी नव्याने अंदाज व्यक्त करताना हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात ४८ तासांत थंडीची कडाक्याची लाट येणार असल्याचे सांगितले आहे.

जळगावसह धुळे, नंदुरबार व नाशिक जिल्ह्यासाठी ऑरेंज ॲलर्ट दिला असून, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये येलो ॲलर्ट दिला आहे. नागरिकांनी थंडीच्या लाटेच्या दिवसांत रात्री, पहाटे घराबाहेर पडू नये. आवश्‍यक असल्यास पुरेसे उबदार कपडे घालूनच बाहेर पडावे, असे आवाहनही हवामान खात्याने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT