Superintendent of Police M. Rajkumar, Deputy Superintendent Rakesh Jadhav, Inspector Vijay Shinde, officers and staff. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : विप्रोतील चोरीला गेलेले संतूर साबण राजस्थानातून हस्तगत; 2 संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर (जि. जळगाव) : शहरातून संतूर साबणाचा ५५ लाखांचा चोरून नेलेला माल पोलिसांनी राजस्थानातून हस्तगत केला. दोन सराईत गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना यश आले असून, दोन संशयित फरारी झाले आहेत. (Wipro Stolen Santoor Soap Seized From Rajasthan 2 Suspects in custody Jalgaon Crime News)

ट्रकमधून माल वाहतूक करण्यासाठी राजस्थान येथील सुनील ओमप्रकाश भार्गव याने आपले नाव कैलास गुजर सांगून अमळनेरमधून संतूर साबणाच्या ५५ लाख ९७ हजार ७६० रुपयांच्या ९८० पेट्या ट्रक (आरजे ११, जीए ८१३८)मध्ये भरल्या. धुळे- मालेगावमार्गे जाताना चालकाने दिशाभूल करून तेथून नवापूरमार्गे सुरत व अहमदाबादला गेला.

प्रत्येक वेळी टोल नाक्यावरून जाताना तो फास्ट टॅग बदलवत असल्याने ट्रक क्रमांक बदलत होते. गुन्ह्यातील मास्टर माइंड नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी (वय ३१, रा. जयपूर) याने त्याचवेळी त्याच क्रमांकाचा ट्रक रावेर येथून रवाना केलेले दाखविले होते. त्यामुळे पोलिसांनाही नेमका तपास उमजत नव्हता.

ज्या क्रमांकवरून चालक आधी बोलला, त्याचे लोकेशन दुसरीकडेच येत होते. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी उपनिरीक्षक अनिल भुसारे, उपनिरीक्षक भय्यासाहेब देशमुख, हवालदार सुनील हटकर, पोलिस कर्मचारी नीलेश मोरे, मिलिंद भामरे, उज्वल पाटील यांची दोन पथके विविध दिशेला रवाना केली होती.

दोनवेळा पथक रिकाम्या हाताने माघारी फिरले होते. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. नीलेश मोरे यांनी सीडीआर लोकेशनवरून चालकाने आपल्या प्रेयसीला केलेल्या कॉलवरून तिचा दुसरा संपर्क नंबर शोधला. मात्र, चालकाच्या प्रेयसीच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसाचा नंबर ब्लॉक केला. प्रेयसीचा बिकानेर येथील पत्ता शोधून फोटोवरून माहिती काढली असता, सुनील भार्गव याने कैलास गुजर नाव बदलवले असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

तो अनिल बाबूलाल भार्गव आणि नरेंद्रकुमार हरिप्रसाद स्वामी यांच्यासोबत मोठ्या चोऱ्या करीत असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांना स्वामीचा नंबर मिळाला. मात्र, तोही आपला मोबाईल काही किलोमीटर अंतरावरून बंद करीत होता. पोलिस कर्मचारी नीलेश मोरे यांनी सतत सात दिवस संशयिताच्या घराबाहेर पहारा दिला.

तरीही संशयित सापडला नाही. स्वामी हा हैद्राबाद ते जयपूर रेल्वेने एसी कोचमधून येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून श्री. मोरे चितोडगड रेल्वेस्थानकावर पोचले. दुसरे पथक भिलवाडा स्थानकावर थांबले.

चितोडगड स्थानकावरून मोरे रेल्वेने प्रवास करू लागले. भिलवाडा स्थानकावर थांबलेल्या पथकाने गाडी थांबताच स्वामीवर झडप घातली आणि त्याला पकडले. त्याच्यासोबत हारून रशीद साजिदखान (वय ३८) यालाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १८ लाख ५६ हजार ४०० रुपयांच्या ३२५ साबणाच्या पेट्या हस्तगत केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

Trapit Bansal: भारतीय तरुणाचा जगभरात डंका! IITian त्रपित बंसलला Meta कडून अब्जावधींची ऑफर; सॅलरी ऐकून व्हाल थक्क

Latest Maharashtra News Updates : शित्तूर -आरळा व चरण -सोंडोली पुलावर सुरक्षिततेसाठी कोकरूड पोलिसांनी लावले बॅरिकेट

Pune News : पुणे बाजार समितीच्या दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

SCROLL FOR NEXT