dead esakal
जळगाव

Jalgaon Accident News : कार अपघातात महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : नशिराबादजवळ चालकाचा ताबा सुटल्याने रोडवरील खंब्याला कार आदळून झालेल्या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २ डिसेंबरला दुपारी चारच्या सुमारास घडली.

या प्रकरणी सोमवारी (ता. ११) नशिराबाद पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला.(Woman dies in car accident jalgaon news)

नशिराबादजवळील जय भोले हॉटेलसमोरील राष्ट्रीय महामार्गावरून २ डिसेंबरला दुपारी चाराल चालक रितेश कैलास पाटील (रा. पातोंडी ता. रावेर) कारने (एमएच १९ सीव्ही ७०३३) भुसावळकडे जात होता.

कारमध्ये सावित्रीबाई सुनील हंसकर (वय ४५, रा. रावेर), शीतल रामलाल भावसार (४१ रा. शांतिदूतनगर, रावेर) या दोघी बसल्या होत्या. चालकाचा कारवरील ताबा सुटून कार रस्त्यावरील खांबावर आदळली.

या अपघातात सावित्रीबाई हंसकर गंभीर जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कारचालक रितेश पाटील, शीतल भावसार जखमी झाले. शीतल भावसार यांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलिसांत कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. सहाय्यक फौजदार अलियार खान तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT