Accident esakal
जळगाव

Jalgaon Accident News : क्रेनच्या धडकेत महिला जागीच ठार; MIDCतील घटना

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : एमआयडीसीतील माधुरी वेअर हाऊसजवळून जाताना भरधाव क्रेनच्या धडकेत महिला जागीच ठार झाली. ही घटना शुक्रवारी (ता. ३१) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पोलिसांनी क्रेनचालकाला अटक केली आहे. (woman killed on spot after being hit by speeding crane jalgaon accident news)

रंजना उत्तम येसे (वय ५३, रा. म्हाडा कॉलनी) यांचा राका चौकात लॉंड्रीचा व्यवसाय आहे. शुक्रवारी (ता. ३१) सकाळी दुकान उघडून साफसफाई करून त्या घरी जात होत्या. सकाळी साडेनऊच्या सुमारास मागून भरधाव येणाऱ्या क्रेनने (एमएच ४०, पी २३०९) रंजना यांना जोरदार धडक दिली.

त्यामुळे रंजना जमिनीवर पडल्या आणि क्रेनचे पुढचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

कुटुंबीयांची गर्दी

अपघाताची माहिती मिळताच संबंधित महिलेच्या कुटुंबियांसह नालतगांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गर्दी केली होती. मृत महिलेच्या पश्चात मुलगा विकास, विवाहित मुलगी, सून आणि नात असा परिवार आहे.

क्रेनचालक अटकेत

घटनास्थळी एका ठिकणी असलेल्या सीसीटीव्हीमध्ये घटना कैद झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने एमआयडीसी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT