Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : गाडी पार्क करण्याच्या क्षुल्लक कारणावरून महिलेवर सुरीने वार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : रेल्वे स्थानक परिसरात गाडी पार्क करण्याच्या कारणावरून चक्क महिलेवर धारदार सुरीने वार करण्यात आल्याची घटना रविवारी (ता. २८) रात्री अकराला घडली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ वाहन लावण्यावरुन हा वाद झाला. (woman was stabbed with knife for reason of parking car jalgaon crime)

या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. औद्योगीक वसाहत परिसरातील आयोध्यानगर येथील सरला अनिल चौधरी (वय ४२) ह्या हात हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात.

गेल्या रविवारी रात्री आठच्या सुमारास त्या कामानिमित्त रेल्वे स्टेशनजवळील आंबेडकर पुतळ्याजवळ आल्या होत्या. त्यावेळी गाडी पार्किंगला लावण्याच्या कारणावरून विकास अभिमान पवार (वय ३५, रा. तेली चौक) याने त्यांच्याशी वाद घातला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानंतर त्याने हातातील सुरीने वार करून व चापटाबुक्क्यांनी मारहाण करत गंभीर दुखापत केली. या वेळी त्याने शिवीगाळही केल्याचे सरला यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सहाय्यक फौजदार उमेश भांडारकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT