murder esakal
जळगाव

क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून

आल्हाद जोशी

एरंडोल (जि. जळगाव) : जवखेडा (ता. एरंडोल) येथे किरकोळ वाद झाल्यामुळे संतप्त झालेल्या पतीने लाकडी दांड्याने बेदम मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला. पोलिसांनी संशयित पतीस अटक केली आहे.

बाळू भाया बारेला पत्नी भुरकीबाई बारेला व सहा मुलांसह जवखेडा येथे एका शेतात राहून शेतीकामे करून परिवाराच्या उदरनिर्वाह करीत होते. २ जूनला महिलेचा भाऊ सुरसिंग फुलसिंग बारेला यास सकाळी सातच्या सुमारास कैलास बारेला यांनी मोबाईलवरून तुमची बहीण भुरकीबाई बारेला (वय ३०) हिचा मृत्यू झाला असून, मेव्हणे बाळू बारेला मृतदेह घेऊन मूळगाव झापडीमल्ली (ता. वरला, जि. बडवाणी) येथे घेऊन जात असल्याचे सांगितले.

बहीण मृत झाल्याचे समजताच तिची आई व भाऊ झापडीमल्ली येथे गेले. त्या ठिकाणी भुरकीबाई बारेला हिचा मृतदेह गुंड्या सुरसिंग बारेला याच्या घरात ठेवला होता. भाऊ सुरसिंग बारेला यांनी मृतदेह कोणी आणला, याबाबत माहिती विचारली असता, मेहुणा बाळू बारेला व त्यांच्या शेठने गाडीतून मृतदेह आणल्याचे त्याला सांगण्यात आले.

बाळू बारेला मृतदेह टाकून पळून गेला, तर त्याचा शेठ गाडी घेऊन निघून गेल्याचे सांगितले. सायंकाळी कैलास बारेला याने सुरसिंग बारेला यांना सांगितले, की रात्री दहाच्या सुमारास बाळू बारेला पत्नी भुरकीबाई बारेला हिस लाकडाच्या दांड्याने मारहाण करीत होता. त्या वेळी नुचडिया बारेला समजाविण्यासाठी गेले असता, त्यासही मारण्याच्या प्रयत्न केल्याने तो पळून गेला. याबाबत भुरकीबाईचा भाऊ सुरसिंग बारेला यांनी वरला (जि. बडवानी) येथे तक्रार दिली. तेथून ती तक्रार एरंडोल पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे. संशयित बाळू बारेला यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश आहिरे व त्यांचे सहकारी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Pune Hospital Row: टीकेच्या झंझावातात भिमाले माघारी; बाणेर कर्करोग रुग्णालयावरील वडिलांचे नावाचा फलक हटवला

Devgad Hapus AI : देवगड हापूस गुणवत्तेसाठी AI स्कॅनिंग मशीनला अनुदान द्यावे; राहुल शेवाळे यांची केंद्रीय कृषिमंत्र्याकडे मागणी

Crime: इंटरनॅशनल अशोक खरात! ९ महिने, ९७ गुन्हे, ६१ महिलांवर अत्याचार... ऑस्ट्रेलियात भारतीय वंशांच्या व्यक्तीचं कांड उघड

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना मानवंदना

SCROLL FOR NEXT