administration work during Corona is remarkable Gulabrao Patil sakal
जळगाव

जळगाव : कोरोनाकाळात प्रशासनाचे कार्य उल्लेखनीय ; गुलाबराव पाटील

प्रजासत्ताकदिनी मुख्य ध्वजवंदन सोहळ्यात कौतुक

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व क्षेत्र प्रभावित झालेले असताना प्रशासनाने चांगले काम करत जिल्ह्याच्या विकासात बाधा येऊ दिली नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनाचा जिल्हास्तरीय मुख्य समारंभ पोलिस कवायत मैदानावर पार पडला, त्या वेळी ते बोलत होते.जिल्ह्यातील कोणीही व्यक्ती बेघर राहू नये, त्याला आपल्या हक्काचे घर मिळावे म्हणून राज्य शासनामार्फत महाआवास अभियान राबविण्यात येत असून या अभियानाची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले. पोलिस दलामार्फत मानवंदना देण्यात आली.

यांची होती उपस्थिती

या वेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा राऊळ- गिरासे, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे, शुभांगी भारदे, शासकीय आरोग्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सरिता खाचणे आणि अपूर्वा वाणी यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणातही जिल्हाधिकारी राऊत यांनी ध्वजवंदन केले. तर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत टप्पा क्रमांक ३च्या आवारातही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांच्या हस्ते ध्वजवंदन करून सामूहिक राष्ट्रगीत म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahini Yojana : लाडकी बहीण योजनेतून तुमचंही नाव वगळलं नाही ना? असं करा चेक...

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : विठ्ठलवाडी मंदिरात भाविकांची गर्दी

'ही' मुस्लिम अभिनेत्री मन:शांतीसाठी वाचते हनुमान चालिसा, म्हणाली, 'मला गायत्री मंत्र खूप आवडतो, त्याने ऊर्जा जाणवते'

"माजोरडी उत्तरं..." हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर मराठी अभिनेत्याची पोस्ट; "अपेक्षा खरंच मोठी आहे का ?"

Latest Maharashtra News Live Updates: अर्जेंटिनाचा यशस्वी दौऱ्यानंतर , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ब्राझीलची राजधानी रिओ दि जनेरियो इथं भव्य स्वागत

SCROLL FOR NEXT