death  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : कामगारदिनीच कामगाराची आत्महत्या; कुटूंबीयांना घातपाताचा संशय

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरातील मेहरूण परिसरातील ३६ वर्षीय कामगाराने विषारीद्रव्य प्राशन करुन एमआयडीसीतील कंपनीत साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. (worker committed suicide at company in MIDC after ingesting poison jalgaon crime news)

मयताच्या कुटूंबीयाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. संजय बंडू शेवाळे (वय-३६ ) असे मृत कामगाराचे नाव आहे. शिरपुर(ता.जि.धुळे) येथील मुळ रहिवासी संजय बंडू शेवाळे(वय-३६) हे गेल्या दहा-बारा वर्षापासुन कामधंद्यासाठी जळगाव शहरातील मेहरूण परिसरत आई, पत्नी व दोन मुलांसोबत वास्तव्याला होते.

संजय हा एमआयडीसी परिसरातील साईराम ट्रेंडींग कंपनीतील कोल्ड स्टोरेज या ठिकाणी कार्यरत होता. नेहमीप्रमाणे रविवार(ता.३०) रोजी सकाळी ८ वाजता जेवणाचा डबा घेवून संजय शेवाळे हा कंपनीत कामावर गेला होता. सोमवार(ता.१) मे रोजी कामगार दिन असल्यामुळे कंपनी बंद होती.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कंपनीतील सफाई कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेला होता. यावेळी लोखंडी अँगलला संजय शेवाळे याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्याने तातडीने एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांना फोन करून घटनेची माहिती कळविली.

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला. रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई कमलबाई, पत्नी आश्विनी, विवाहित बहिण, दुर्गेश (वय-४) आणि सलोनी (वय-६) ही दोन मुले आहेत. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT