dead esakal
जळगाव

Jalgaon News: हौदात बुडून कामगाराचा चटई कंपनीमध्ये मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : चटई कंपनीत रात्रपाळीवर कामासाठी आलेल्या कामगाराचा कंपनीच्या आवारातील पाण्याच्या हौदात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश वसंत सोनार (३०, रा. साईनगर, सुप्रिम कॉलनी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मृत्युच्या कारणाचा शोध पेालिस घेत आहेत. (Worker dies of drowning in mat company jalgaon news)

जळगाव एमआयडीसीतील जे सेक्टरमध्ये मीनाक्षी गोल्ड या चटई कंपनीत ही घटना घडली.कंपनीमध्ये गणेश वसंत सोनार हा तरुण कामाला होता. रविवार(ता.१७) रात्रपाळीला गणेश हा कामावर गेला होता.

कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात रात्रीच्या सुमारास गणेश हा बुडाला. रविवारी सकाळच्या सुमारास दुसऱ्या शिफटमधील कर्मचारी ड्युटीवर आल्यानंतर त्यांना हौदात गणेश हा बुडालेला दिसून आला.

त्यांनी लागलीच घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाल्यावर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, किशोर पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

एमआयडीसी पोलिसांनी कंपनीतील इतर कामगारांच्या मदतीने गणेशचा मृतदेह हौदातून बाहेर काढला. त्यानंतर पंचनामा करून मृतदेह शासकीय रूग्णालयात आणला गेला. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती गणेशला मृत घोषीत करताच कुटूंबीयांसह नातेवाईकांनी आक्रोश केला. गणेश नेमका कसा बुडाला किंवा काय दुर्घटना झाली याचा पोलिस शोध घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: फेरीवाल्यांसाठी आता पोलीस व्हेरिफिकेशन आणि क्यूआर कोड लायसन्स अनिवार्य; पुणे महानगरपालिकेचा मोठा निर्णय

IPL 2026: शुभमन गिलने विराटचा तो विक्रम मोडत नवा इतिहास घडवला; बटरनेही किंग कोहलीच्या यादीत मिळवलं स्थान

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार हा अवमान नव्हे, उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, चौकशीची मागणी करणाऱ्या महिलेवरील गुन्हा रद्द

Free FASTag Money: आता मिळणार 1,000 रुपयांचा FASTag फ्री! फक्त एक काम करायचं, सरकारची नवी भन्नाट योजना

शरद पोंक्षेंना तिसऱ्या स्टेज कॅन्सरची कल्पनाच नव्हती; पत्नीनं सांगितला किस्सा, स्वत: केले आयुर्वेदिक उपचार

SCROLL FOR NEXT