Death News esakal
जळगाव

Jalgaon News : अपघातात जखमी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पहूर (ता. जामनेर) : एसटी बसने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या मजुराचा मंगळवारी (ता. ७) पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला.

पहूर बसस्थानक परिसरात एसटी बसने दिलेल्या धडकेत हातगाडीवर मजुरी करून उदरनिर्वाह करणारा मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ६) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली होती.

जखमीस तत्काळ पहूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीची अवस्था गंभीर असल्याने गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले. (Worker injured in an accident Death during treatment Jalgaon News)

हेही वाचा : प्राप्तिकरासाठी निवडा तुमच्या सोयीची प्रणाली

अरुण नाना मोरे (वय ६१, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर, पहूर पेठ) हे हातगाडीवर हमाली करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास पहूर बसस्थानक परिसरात हातगाडी लोटत असताना समोरून येणाऱ्या पाचोरा बस आगाराची भुसावळ-पाचोरा बसने (एमएच १४, बीटी २०७९) समोरून धडक दिली.

अरुण मोरे यास गंभीर दुखापत झाली होती. त्यास पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून गोदावरी हाँस्पिटल येथे हलविण्यात आले आहे होते.

या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात बसचालक गुणवंत भागवत गीते (वय ५४, रा.पिंपळगाव हरेश्वर, ता.पाचोरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरत लिंगायत व पोलिस कर्मचारी रवींद्र देशमुख करीत आहे. दरम्यान, आज पहाटे उपचार सुरू असताना गंभीर जखमी असलेल्या अरुण मोरे यांनी प्राण सोडले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahatma Phule: जन्म द्विशताब्दी वर्षातच फुलेंच्या विचार साहित्याचा शासनाला विसर! शासकीय ग्रंथागारात पुस्तकं उपलब्धच नाहीत; फुले साहित्यप्रेमींचा आंदोलनाचा इशारा

Kumbh Mela Viral Girl Monalisa: मोनालिसा अल्पवयीन असल्याचं तपासात उघड, फरमान खानवर 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा; कुंभमेळ्यात झाली होती व्हायरल

Mumbai News: मेट्रो-१० ला गती; पॉड टॅक्सीचा प्लॅन तयार! मुंबईनंतर 'या' तीन शहरांमध्ये पॉड टॅक्सी सुरू होणार, सरकारचा मोठा निर्णय

Israel Reaction Ceasefire : पुन्हा युद्धाची ठिणगी पडणार! अमेरिका–इराण युद्धविरामावर इस्रायलची तीव्र नाराजी; पाकिस्तानची मध्यस्थी अमान्य, काय आहे इतिहास

Sara Tendulkar Viral Video : कोणाला सपोर्ट करणार, लखनौ की गुजरात? सारा तेंडुलकर गोड हसली अन् तिची प्राईजलेस रिअ‍ॅक्शन, Video

SCROLL FOR NEXT