worker stole 1 lakh goods from warehouse Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : काम सोडून गेलेल्या कामगारानेच फोडले गुदाम; सव्वालाखांचा माल लंपास

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील चेतन प्रेसीजन टुल्स कंपनीच्या गुदामाची खिडकी तोडून सव्वा लाखांच्या वायर बंडलची चोरी प्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली असून, तो पूर्वी याच कंपनीत कामाला होता. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (worker stole 1 lakh goods from warehouse Jalgaon Crime News)

औद्योगीक वसाहतीतील जी-सेक्टरमध्ये चेतन प्रेसीजन टुल्स कंपनीच्या गुदामातून २ ते २४ जुलैदरम्यान चोरट्याने खिडकी तोडून एक लाख २५ हजार रुपयांची वायरच्या बंडलची चोरून नेले होते. योगेश भवान सोनार (वय ३४, रा. अयोध्यानगर) यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, राहुल रगडे, विशाल कोळी, साईनाथ मुंढे, निलोफर सय्यद, इम्तीयाज खान यांनी माहितीच्या अधारे सुभाष पंडित पाटील (वय ३९, रा. विठ्ठल मंदिराजवळ, सुप्रीम कॉलनी) याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सुरवातील उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या संशयिताला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयित सुभाष पाटील याला न्यायालयात हजर करण्यात आले.

न्यायाधीश सुवर्णा कुलकर्णी यांनी त्यास तीन दिवसांच्या कोठडीत रवाना केले आहे. पोलिस नाईक इम्रानअली सय्यद तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT