Jalgaon: Shiv Sena activists protesting in front of the Municipal Corporation on Thursday esakal
जळगाव

Jalgaon News : शिवसेना ठाकरे गट, भाजपत घोषणायुद्ध

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : महापालिकेच्या सभागृहात बुधवारी (ता. २१) श्रीरामाच्या मुद्यावरून पेटलेल्या वादाचे पडसाद गुरुवारी (ता. २२) उमटले. महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांविरुद्ध जोरदार घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता.

भारतीय जनता पक्षातर्फे सकाळी अकराला महापालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. महापौर कुलभूषण पाटील यांनी सभागृहात श्रीरामांचा अपमान केल्याचा आरोप करीत त्यांचा निषेध करण्यात आला.

उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. महापालिकेचे पक्षाचे महानगरप्रमुख दीपक सूर्यवंशी, उपगट नेते राजेंद्र घुगे पाटील, कैलास सोनवणे, ॲड. शूचिता हाडा, विशाल त्रिपाठी, नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. (Workers of BJP and Shiv Sena Thackeray group shouted slogans against each other near entrance Municipal Corporation Bharatiya Janata Party protested in front of Municipal Corporation at 11 am Jalgaon News)

शिवसेनेतर्फे भाजपचा निषेध

शिवसेना ठाकरे गटातर्फेही महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करण्यात आले. पिंप्राळ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास व शहर विकासास विरोध करून सभा बंद पाडल्याबद्दल भाजप नगरसेवकांचा निषेध कण्यात आला. शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी भारतीय जनता पक्षाविरोधी घोषणा देण्यात आल्या. मंगला बारी, पीयूष गांधी, अंकित कासार, अमित कासार व कार्यकर्तेही उपस्थित होते. शिवसेना व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने असल्यामुळे या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. पोलिस बंदोबस्त मोठ्या संख्येने होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT