Honey Bee esakal
जळगाव

मधमाशा नसल्या, तर माणसाचे जगणं मुश्कील होईल...

भविष्यात मधमाशा नसल्या, तर माणसाचे जगणं मुश्कील होईल, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक प्रा. विक्रम पाटील यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

तोंडापूर (ता. जामनेर) : भविष्यात मधमाशा (Honey Bee) नसल्या, तर माणसाचे जगणं मुश्कील होईल, असे प्रतिपादन पर्यावरण अभ्यासक प्रा. विक्रम पाटील यांनी केले.
प्रा. विद्यानंद अहिरे व कैलास कोळी याच्या सहकार्याने जागतिक मधमाशा दिनानिमित्त माडवे बुद्रुक येथे झालेल्या कार्यशाळेत ते बोलत होते.

विक्रम पाटील म्हणाले, की एक मधमाशी एका दिवसात सुमारे २०० फुलांना भेट देते. मधमाशीच्या एका पोळ्यात किमान पाच हजार, तर कमाल पन्नास हजार मधमाशा असतात. त्यामुळे निसर्गात परागीभवन करायचे सर्वांत जास्त कार्य मधमाशा करतात. शेतात मधमाशा नसल्यास सूर्यफूल, कांदा, मोहरी अशी पिके घेतली जाऊ शकत नाही. मधमाशांशिवाय शेती शक्य नाही. माणूस नसला तर सृष्टीचे फारसे नुकसान होणार नाही, पण मधमाशा नसल्या, तर माणसाचे जगणं मुश्कील आहे.

प्रा. विद्यानंद अहिरे यांनी मधमाशी पालनविषयक सखोल मार्गदर्शन व प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषी सहाय्यक किशोर पाटील यांनी पोखरा योजनेची माहिती दिली. सुनील गायकवाड यांनी शेतकऱ्यांना मशागतपूर्व व पीक येणाऱ्या संभाव्य रोगापासून कसे वाचता येईल. ग्रामीण भागातील शेतकरी समृद्ध होण्यासाठी घ्यावयाच्या काळजी, ठिंबक सिंचनचा वापर याबाबत मार्गदर्शन केले. तहसीलदार अरुण शेवाळे यांनी मधमाशापालन, पशुपालन अशा विविध व्यवसाय शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून करा व शासनाच्या योजनाचा लाभ घ्या, असे आवाहन केले.

कार्यशाळेला माडवे बुद्रुक, ढालसिंगी, ढालगाव, कुंभारी बुद्रकु, तोंडापूर भारुडखेडा, चिंचखेडा, शेंगोळा येथील शेतकऱ्यांसह जामनेरचे तहसीलदार अरुण शेवाळे, मधुमक्षिका अभ्यासक प्रा. विद्यानंद अहिरे, कृषी सहाय्यक किशोर पाटील, सुनील गायकवाड, तालुका आत्मा तंत्र सहाय्यक राकेश पाटील, वनरक्षक व्ही. पी. महाजन, राष्ट्रवादी युवक कॉंग्रचसे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, सरपंच सुरतसिंग जोशी, प्रदीप पाटील, मंडलाधिकारी आर. के. चौधरी, ढालसिंगीचे उपसरपंच संभाजी गोतमारे, गोपाल भोंबे महेमूद तडवी, ईश्वर राठोड, संजय शिंदे, जितेंद्र पाटील, एकनाथ कोळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : "नाशिकला संधी दिली आता मुंबईत संधी द्या" - अमित ठाकरे

Education Department : शिक्षक पुरस्काराबाबत उदासीनता; १० तालुक्यांतून केवळ दोन-दोनच प्रस्ताव

Crime News : ‘मुलबाळ होत नाही’ म्हणून विवाहितेचा छळ; धारदार हत्याराने वार करून जीवे ठार मारल्याचा आरोप

'क्रांतिज्योती विद्यालय-मराठी माध्यम’च्या शूटिंगला सुरुवात ! आदिती तटकरे यांच्या हस्ते मुहूर्त सोहळा संपन्न

SCROLL FOR NEXT