Yogesh Pardeshi from Nagardevala has been cultivating RV tuber for the last three years.jpg 
जळगाव

पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीकडे तरुणाईचा कल

शैलेंद्र बिरारी

नगरदेवळा (ता.पाचोरा, जळगाव) : पारंपरिक शेती करत असताना आधुनिक शेतीकडे तरुणाईचा कल दिसत असून येथील योगेश परदेशी हे गेल्या तीन वर्षांपासून आरवी या कंद वर्गीय पिकाची लागवड करत आहे. 

सुरुवातीला मध्यप्रदेश खंडवा येथून बियाणे आणले. एक एकर क्षेत्रात गादी वाफ्यावर लागवड केली. आठ क्विंटल बियाणे आणून  लागवड केली साधारण पाच महिन्यात पीक परिपक्व झाले. काही शेतकऱ्यांना बियाणे तर उर्वरीत वाशी मध्यप्रदेशात विक्री केल. एकंदरीत एक एकरातून दहा टन उत्पादन झाले तर एक लाख तीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. पुन्हा तीन एकरात लागवड केली असून दोन एकरातील पीक परिपक्व झाले तर एक एकर परिपक्व होत आहे. पीक परिपक्व झाले की बाजार भावानुसार त्याची काढणी केली जाते. 

काही महिने जमिनीत राहिले तरी चालते. मात्र पिक काढलें की त्याची विक्री करणे आवश्यक असते. नगरदेवळा परिसरात प्रथमच हा प्रयोग यशस्वी झाला असल्याने अनेक शेतकरी या कडे वळतील. अरवी, अरबी, रान अळूचे गड्डे अश्या विविध नावाने ओळखले जाते. वैज्ञानिक नाव कोलोकैसिया एक्सुलेन्टा आहे. 

अरवीचे फायदे 

अरवी मध्ये सोडियमची मात्रा असल्याने मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. त्याचबरोबर रक्तदाब, हृदय विकार, कॅन्सर, मधुमेह, दृष्टी आदी विकारावर उपयुक्त असून पचन क्षमता सुधारण्यास मदत होते. कार्बोहाड्रेड, फायबर, पोटॅशियम त्यात असून जीवनसत्त्व एक, सी, इ, बी 6 असल्याने शरिरास उपयोगी आहे. तर ताण तणाव दूर होण्यास हातभार लागतो. 

शरिरास जेवढे उपयोगी असले तरी कच्चे अरवी खाल्ल्याने घशात जळजळ होते. वातविकार,अस्थमा, सांधेदुखी, वात विकार, गॅसेस आदी विकार असणाऱ्या व प्रसुती झालेल्या महिलांनी हे खाणे टाळावे. त्याची पानें देखील त्रासदायक आहेत.


संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT