death esakal
जळगाव

Jalgaon News : रेल्वेखाली आल्याने तरुण जागीच ठार

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : धावत्या रेल्वेखाली आल्याने दिनकरनगरातील तरुण जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी (ता. १४) रात्री दहाच्या सुमारास घडली.

नारायण शरद पवार (वय २६) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो नाशिकला (Nashik) कामाला आहे. (young man died on spot after falling under train jalgaon news)

दोन दिवसांपासून आई-वडीलांची भेट घेण्यासाठी आला होता. नारायणची ही भेट शेवटची ठरली. दिनकरनगरातील नारायण पवार गेल्या तीन महिन्यांपासून नाशिक येथील मेडिकल दुकानावर काम करीत होता.

दोन दिवसांपूर्वीच तो जळगावला आई-वडील व बहिणीला भेटण्यासाठी आला होता. मंगळवारी (ता. १४) रात्री आठला चौकातून जाऊन येतो, असे आईला सांगून घराबाहेर पडला. मात्र, तो रात्री घरी आला नाही.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

रात्री दहाच्या सुमारास जळगाव-आसोदादरम्यान रेल्वे रूळ ओलांडत असताना, धावत्या रेल्वेखाली आल्याने तो जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर शनिपेठ पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मनोज इंद्रेकर, मुकुंद गंगावणे यांनी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. पोलिसांनी खिशातील कागदपत्रांच्या आधारे मृताची ओळख पटविली.

खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेह रवाना केला. बुधवारी (ता. १५) सकाळी दहाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांना देण्यात आला. मृत नारायणच्या पश्चात आई अनिता, बहीण पूनम आणि वडील शरद रामदास पवार असा परिवार आहे. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT