Beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जळगावात गुंडाराज पुन्हा सक्रिय; नशिराबादच्या तरुणाला मारहाण, सोनसाखळीसह पोबारा

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : येथील रेल्वेस्थानकात बुधवारी (ता. २५) मध्यरात्री नशिराबादच्या तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या गळ्यातील तीन तोळ्याची सोनसाखळी तोडून दोघांनी पोबारा केला. शहर पोलिसांमध्ये या गुन्ह्याची नोंद झाली आहे. रेल्वेस्थानक परिसरात गुंडाराज पुन्हा सक्रिय झाले आहे. पाकीट मार, गर्दुल्ले यांच्यासह भुरट्या चोरांची वर्दळ वाढली आहे.

नशिराबाद (ता.जळगाव) येथील भूषण हिरालाल चौधरी (वय ३१) हा तरुण व्यापारी असून नशिराबाद गावात वडिलोपार्जित घर असल्याने तेथे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहे. (young man gold chain stolen jalgaon crime news)

भूषण हा बुधवार (ता.२५) मध्यरात्री एकच्या सुमारास कामानिमित्त जळगाव रेल्वेस्थानकात आला होता. समोरील रिक्षा थांब्याजवळ उभा असताना चेतन दिलीप येवले आणि अविनाश विजय रंधे या दोघांनी भूषणची कुरापत काढली.

कारण नसताना शिवीगाळ करून हुज्जत करण्यास सुरवात केली. माझ्याशी कशाला वाद घालताय म्हणत भूषणने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, त्याला देाघांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत भूषणच्या गळ्यातील तीन तोळे वजनाची ९७ हजार रुपयांची सेानसाखळी हिसकावून दोघे पसार झाले.

सोनसाखळी तोडल्याचे लक्षात येताच भूषणने आरडा-ओरड केली. मात्र त्याच्या मदतीला कुणी आले नाही.

अखेर तसाच तो शहर पोलीस ठाण्यात पोचला. पोलिसांना माहिती दिल्यावर सांगितल्यानंतर मारहाण करणारे चेतन आणि अविनाश यांच्याविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून संशयितांचा शोध सुरू झाला. मात्र दोघे मिळून आले नाही. सहाय्यक उपनिरीक्षक बशीर तडवी तपास करत आहेत.

रेल्वेस्थानक दुर्लक्षित

गुन्हेगारीचे आश्रयस्थान असलेल्या रेल्वेस्थानकाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. येथील पेालिस चौकी बारा महिने बंदावस्थेत असते. शहर पोलीस ठाण्याकडून रात्र गस्त आणि रेल्वेस्थानकासाठी कागदावर ‘फिक्स पॉइंट ड्युटी' लावण्यात येते. प्रत्यक्षात गस्तीचे रिकामे वाहन येते. ‘सायरन' वाजवत निघून जाते. पोलीस वाहन असेपर्यंत दडून बसलेले गुन्हेगार ‘धंद्याची' सुरवात करतात. रात्रभर हा खेळ सुरू असतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे – एकनाथ शिंदे

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT