Tea esakal
जळगाव

जळगाव : गरम चहा पडल्याने तरुण भाजला

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : कपाटावर ठेवलेला गरम चहा अंगावर पडल्याने तरुण गंभीररीत्या भाजला गेल्याची घटना बांभोरी येथे घडली. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातून प्राप्त माहितीनुसार, पंकज शालिक नन्नवरे (वय २३, रा. बांभोरी) हा तरुण आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ट्रॅक्टर चालवून उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी (ता. २४) रोजी सकाळी ८ वाजता घरी असताना त्याच्या आईने चहाने भरलेला ग्लास कपाटावर ठेवला होता. याचवेळी पंकज नन्नवरे हा जेवण करण्यासाठी बसत असताना त्याचा चहाच्या ग्लासला धक्का लागला. त्यात ग्लासमधील उकळती चहा पाठीवर पडल्याने तो गंभीररीत्या भाजला गेला. बांभोरी येथील खासगी डॉक्टराकडून प्रथमोपचार घेतल्यानंतर जास्तच त्रास जाणवू लागल्याने कुटुंबीयांनी त्याला जळगावी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. पंकजची प्रकृती बरी असून पुढील उपचार सुरू आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight: विमान उड्डाणाच्या काही क्षण आधी मोठा ट्विस्ट! पायलटचा उड्डाणास नकार; प्रवाशांचे आंदोलन

Junior Asia Cup Hockey: तब्बल १९ गोल... भारताच्या पोरींनी उडवली पाकिस्तानची पुरती धुळधाण! सेमीफायनलमध्ये दिमाखात धडक

LIC Investment: फक्त 24 रुपये भरून मिळेल 50 लाखांचा इन्शुरन्स! LIC ची बेस्ट स्कीम पाहिली का?

Viral Video : आधी पैसे द्या, मगच जेवण करा! या देशातील लग्नाची अनोखी प्रथा पाहून भारतीय महिलेलाही बसला धक्का, व्हिडिओ शेअर करत म्हणाली...

Marathi News Live Updates : माहिती अधिकाराचा बोजवारा, तीस दिवसांत मिळणे अपेक्षित असलेल्या माहितीसाठी साडेतीन वर्षांचा विलंब; स्वाक्षरीसाठीही तब्बल ११ महिने

SCROLL FOR NEXT