Life imprisonment latest marathi news esakal
जळगाव

Crime Update : तरुणाला कारने चिरडून मारले; सातपुते दांपत्याला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शामखेडा (ता. धरणगाव) येथील प्लॉट भागात किरकोळ कारणावरून वाद होऊन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेल्या तरुणाला कारने चिरडून ठार मारले होते. धरणगाव पोलिसांत दाखल खुनाच्या गुन्ह्यात जिल्‍हा व सत्र न्यायालयाने संशयित पती पत्नीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. योगेश पांडुरंग सातपुते व सपना योगेश सातपुते, अशी आरोपींची नावे आहेत.

शामखेडा प्लॉट भागात भगवान, रघुनाथ सातपुते व पुतण्या महेंद्र गल्लीत चर्चा करीत उभे होते. योगेश व त्याची पत्नी सपना कारने जात होते. त्या तिघांना योगेश व त्याची सपनाने शिवीगाळ करून वाद घातला. वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. योगेशने लाकडी दांडक्याने मारहाण केली. भगवान, त्याचा भाऊ रघुनाथ व पुतण्या महेंद्र दुचाकीने धरणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी जात असताना, त्याच्या मागून सुसाट वेगात कार (एमएच १९, एई ८९६) आणून योगेश व सपना यांनी त्यांच्या दुचाकीला धडक दिली. (Young man is crushed to death by a car Life imprisonment for a couple satpute Jalgaon News)

या अपघातात तिघेही रोडच्या बाजूला फेकले गेले. महेंद्र कारच्या चाकात आल्याने ठार झाला. तरी कार न थांबवता दोघे पती पत्नी फरारी झाले. ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमींच्या जबाबावरून धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला होता.

तपासाधिकारी उपनिरीक्षक एन. एम. काळे यांनी दोषारोपपत्र जिल्हा न्यायालयात सादर केले. न्यायाधीश एस. एम. सापत्नेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी होऊन सरकरी अभियोक्ता ॲड. पंढरीनाथ चौधरी यांनी जखमींसह ११ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवून घेतल्या. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार देविदास राजधर भिल, रतिलाल सोनवणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश पाटील, डॉ. शिवदास चव्हाण, डॉ. प्रवीण जाधव आदींची साक्ष नोंदविली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO PF Withdrawal : पीएफ काढणाऱ्यांसाठी खुशखबर! आता २४ तासांत मिळणार पैसे, EPFOचा मोठा निर्णय

Pune News: नोकरी नाही, घरही विकले! पिंपरीतील हृदयद्रावक घटना; पती, पत्नी आणि मुलीचा मृत्यू, नेमकं काय घडलं..

Latest Marathi News Live Update : ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या पथकाने केलेल्या कामगिरीचा मला अभिमान वाटतो- पंतप्रधान मोदी

Navi Mumbai: नवी मुंबईतील 'जलद पुनर्विकासा'ला ब्रेक? जनाधार वाढवण्याच्या शिवसेनेच्या प्रयत्नांना भाजपचा कायदेशीर सुरुंग

Nanded News: जनावरांचे दूधवाढीच्या नावाखाली फसवणूक, साडेचौदा लाख रुपयांचा ‘दुधारू गोल्ड’ जप्त

SCROLL FOR NEXT