accident sakal
जळगाव

Jalgaon Accident News : बसला ओव्हरटेक करताना चाकाखाली येऊन तरुण ठार; दुसरा जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकी बसच्या चाकाखाली येऊन दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील सोबत असलेला एक जण थोडक्यात बचावला आहे.

ही घटना शुक्रवारी (ता. १३) सायंकाळी शहरातील संत मुक्ताई महाविद्यालयासमोर घडली. (Young man killed while overtaking bus jalgaon accident news )

किसन ऊर्फ कृष्णा तलवारे (वय ३४, रा. बोदवड, ता. मुक्ताईनगर, ह.मु. इच्छापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

शहरातून गेलेल्या छत्रपती संभाजीनगर ते बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या संत मुक्ताबाई महाविद्यालयासमोर हा भीषण अपघात झाला.

यावेळी अवजड वाहतूक करणारा ट्रक हा रस्त्यात मध्येच बेशिस्तीने उभा होता. दरम्यान, याच काळात मागून येणाऱ्या बसला (क्रमांक एमएच १० डीएल ३५५५) ओव्हरटेक करताना दुचाकीने किसन तलवारे व सोबत तुळशीराम वानखेडे हे दोघेजण येथून जात होते.

त्यावेळी अचानक दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी बसच्या चाकाखाली आल्याने किसन तलवारे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सोबत असलेला तुळशीराम वानखेडे थोडक्यात सुदैवाने बचावला आहे.

घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयात हलविण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT