Jalgaon Crime News : शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणास परिसरातील नागरिकांनी पकडून चोप दिला.
संतप्त जमावाने त्या तरुणाची दुचाकीही पेटवून दिली. आज दुपारी घडलेल्या या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे. (young man tried to molest minor girl beaten up by citizens Jalgaon Crime News)
कोल्हे हिल्स परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये पती-पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असे कुटुंब गेल्या १३ वर्षांपासून वास्तव्यास आहे. आज आई-वडील व दोन्ही भाऊ कामानिमित्त बाहेर गेले होते. त्या वेळी १६ वर्षीय मुलगी व तिची सहा वर्षांची लहान बहीण घरी होत्या.
दुपारी साडेतीनच्या सुमारास चंदूअण्णानगरात राहणारा तरुण दुचाकी (एमएच १९, डीक्यू ७१७८)वरून मुलींच्या घराजवळ आला. पाणी पिण्याचा बहाणा करून त्याने अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
बहिणीने केली आरडाओरड
त्यावेळी पीडित मुलीच्या लहान बहिणीने आरडओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी धाव घेत संशयित तरुणास पकडले.
संतप्त जमावाने तरुणास चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्यांची दुचाकी पेटवून दिली. घटनेनंतर तालुका पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेत तरुणाला ताब्यात घेतले. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.