crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जुने भांडण उकरून तरुणाला बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शेळगाव (ता. जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणाला लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना गुरुवारी (ता.२) रात्री ९ वाजता घडली आहे. ( young man was brutally beaten due to old quarrel jalgaon crime news )

याप्रकरणी शुक्रवारी (ता.३) सायंकाळी नशिराबाद पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

शेळगाव येथील मिथुन सुरेश कोळी (वय ३६) या तरुणाला गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित दीपक संजय कोळी, नीलेश बाळू कोळी, खुशाल बाळू कोळी आणि संजय रघुनाथ कोळी (सर्व रा. शेळगाव) यांनी शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच एकाने हातातील काठी मिथुनच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, जखमी मिथुनला नजीकच्या नशिराबाद ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, उपचारानंतर शुक्रवारी मिथुन कोळीच्या फिर्यादीवरून संशयितांविरुद्ध नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलबर्न पोलिसांकडून तपास

IND vs ENG, 2nd T20I: अभिषेक-ईशानची फिफ्टी हुकली, पण तिलक वर्माची दमदार फिनिशिंग, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध १९० धावा पार

Pune Rain Alert: पुण्यात सलग पावसाची रिपरिप; घाट परिसरासाठी पुढील दोन दिवस ‘रेड’ अलर्ट, प्रशासनाचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

Mumbai News: श्वानांचा ९३ नागरिकांना चावा, विधानसभेत मुद्दा गाजला; भटक्या कुत्र्यांसाठी महायुती सरकारचा मोठा निर्णय

Sports Teacher Recruitment : क्रीडा शिक्षक भरती रखडल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात; आझाद मैदानात ८ जुलैपासून बेमुदत धरणे आंदोलन

SCROLL FOR NEXT