Beaten By Iron Rod esakal
जळगाव

Jalgaon : तरूणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : चालताना धक्का लागल्याने तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित भिकन शिरसाठ (वय २१, रा. अण्णाभाऊ साठेनगर, रेल्वेस्थानक रोड, चाळीसगाव) हा मजुरी करून उदरनिर्वाह करतो. तो मंगळवारी (ता. १८) दुपारी साडेचारच्य सुमारास त्याच्या घराजवळून जात असताना नंदू भास्कर शिरसाठ याला चालताना धक्का लागला.(Youth brutally beaten with an iron rod Jalgaon Crime News)

याचा राग आल्याने नंदू शिरसाठ आणि बजरंग नंदू शिरसाठ या दोन्ही भावांनी रोहित याला लोखंडी रॉडने डोक्यावर मारहाण केली तर दुसऱ्याने तोंडावर वीट फेकून मारली.

यात रोहीत हा जखमी झाला. त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्याच्या जबाबावरून संशयित नंदू शिरसाठ आणि बजरंग शिरसाठ (दोन्ही रा. अण्णाभाऊ साठेनगर, चाळीसगाव) यांच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी किशोर सोनवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT