Death esakal
जळगाव

Jalgaon News : राजदेहरे येथील युवकाचा उपचारांदरम्यान मृत्यू; ‘डेंगी’सदृश आजाराचीही लक्षणे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राजदेहरे (ता. चाळीसगाव) येथील युवकाचा छत्रपती संभाजीनगर येथे उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शेषराव नथ्थू राठोड (वय २९) असे मृत युवकाचे नाव असून, त्याला ‘डेंगी’सदृश आजाराचीही लक्षणे होती.

ही घटना मंगळवारी (ता. १०) घडली. या संदर्भात वैद्यकीय अधिकारी प्रशांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शवविच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. (youth from Rajdehra died during treatment jalgaon news)

राजदेहरे येथील युवक शेषराव राठोड याला ‘डेंगी’सदृश आजाराची लागण झाल्याने नांदगाव येथे प्राथमिक उपचार करून चाळीसगाव येथे डॉक्टरांकडे उपचारांसाठी पाठविण्यात आले.

तेथून छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांदरम्यान मृत्यू झाला. शेषराव याच्या शरीरात अल्कोहोलचे प्रमाण जास्त होते.

त्यामुळे अहवाल प्राप्त झाल्यावरच खऱ्या अर्थाने समजेल, असेही त्यांनी सांगितले. शहरात २ ऑक्टोबरला नारायणवाडीतील यश काळे (वय १४) या तरुणाचा ‘डेंगी’सदृश आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

त्यानंतर खासदार उन्मेष पाटील यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना तसेच पालिकेचे व ट्रामा केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी यांना जाब विचारला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal TMC Politics: पश्चिम बंगालमधील राजकीय भूकंपानंतर भाजपने दिली पहिली प्रतिक्रिया; नवीन गट सत्तेत जाणार का?

Solapur MLC Election : सोलापूर विधान परिषदेत मोठा गेम! काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद; एका सहीमुळे संपूर्ण निवडणूक फिरली? फत्तेपूरकरांनी उच्च न्यायालयात घेतली धाव

Baba Vanga Prediction: शेवटच्या ७ महिन्यात 'हे' लोक होणार मालामाल! बाबा वेंगाची भविष्यवाणी चर्चेत; कोणत्या राशींना होणार लाभ?

Karad Bridge Opening : पुणे -कोल्हापूर महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, कऱ्हाडचा उड्डाणपूल वाहतुकीस खुला होण्याची तारीख ठरली

'या' आद्याक्षराने नाव सुरु होणारे लोक असतात स्वतःच्या मर्जीचे मालक ! अत्यंत हुशार आणि श्रीमंत होणारे लोक

SCROLL FOR NEXT