Death News esakal
जळगाव

Jalgaon : दुचाकीच्या धडकेत जखमी तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

चाळीसगाव : भरधाव दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन गंभीर जखमी झालेल्या तरुणावर धुळे येथील रूग्णालयात उपचार होते. दरम्यान, उपचार सुरू असताना जखमी तरुणाचा मृत्यू झाला. हर्षल चंद्रभान चौधरी असे मृत तरुणाचे नाव आहे.

हर्षल चौधरी हा त्याचा चुलत भाऊ सागर रवींद्र चौधरी (वय ३०, रा. जुना मालेगाव रोड, चाळीसगाव) याचे धुळे रस्त्यावरील हॉटेल साई पॅलेसचे सुरू असलेला काम पाहण्यासाठी सोमवारी (ता.७) सायंकाळी सातच्या सुमारास गेला होता. हे काम पाहून झाल्यावर सागर व हर्षल दोन्ही स्वतंत्र दुचाकीने घरी येण्यासाठी निघाले. (Youth injured in two wheeler collision dies during treatment Jalgaon News)

मात्र, चाळीसगाव-धुळे रस्त्यावरील पुन्शी पेट्रोलपंपासमोर महादेव मंदिराकडून येणाऱ्या भरधाव दुचाकीने (क्रमांक : एमएच १९, बीए २६१३ ) हर्षल चौधरी याच्या दुचाकीला (क्रमांक : एमएच १९, बीए १८७७) रात्री नऊच्या सुमारास जोरदार धडक दिली. यात हर्षलला गंभीर दुखापत झाली. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात होते. या प्रकरणी सागर चौधरी यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात चालक रुपसिंग बाबू जाधव (रा. कृष्णापुरी तांडा लोंढे, ता. चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार तपास सुरू आहे. दरम्यान, हर्षलच्या मृत्युमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दहावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीने १५व्या मजल्यावरून मारली उडी, घटनास्थळी सापडली चिट्ठी

Shiv Sena Symbol Dispute : शिंदे गटाने ठाकरेंचे दावे खोडले मूळ पक्षाचा प्रतिनिधी गट ठरविण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार

UPI Transaction Charges : UPI वर ०.४ टक्के शुल्क; १० हजार, १ लाख, १० लाखांच्या व्यवहारावर किती रुपये? जाणून घ्या

Marathi News Live Updates : नागपुरात भरधाव कारचा भीषण अपघात, ७ जणांना उडवलं

Helicopter Crash : भीषण अपघात! हेलिकॉप्टर पार्किंगमध्ये कोसळलं, ३ जणांचा जागीच मृत्यू, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT