Death News esakal
जळगाव

Jalgaon Accident News : दुचाकी दुभाजकावर आदळून तरुण ठार

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांची शृंखला कायम असून, शनिवारी (ता. १) तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ दुचाकी दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तरुण ठार झाला असून, दुसरा जखमी झाला आहे. (Youth killed after two wheeler hit divider jalgaon accident news)

तालुक्यातील पिंप्री अकाराऊत गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर दुचाकी (एमएच १९, डीएच २०४८) महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. यात दुचाकीस्वार चेतन भिका भवर (वय २५, रा. पिंप्री अकाराऊत) हा जागीच ठार झाला, तर वैभव अनिल माळी (वय २२) हा जखमी झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. वैभव माळी यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तर चेतन भवर यांच्या मृत्यूमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

Jungle Safari: वाघ-हत्तींच्या सफारीपलीकडे उत्तराखंडची नवी झेप; आता पर्यटकांना दाखवणार ‘हिमालयीन घोस्ट

डोळ्यांत अश्रू, ओठांवर ‘पुढच्या वर्षी लवकर या…' लालबागच्या राजाला अखेरचा निरोप; गर्दीच्या महासागरात शेवटचा दर्शनाचा क्षण

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

SCROLL FOR NEXT