accident news esakal
जळगाव

Jalgaon Accident News: सेंधव्यात कारचा टायर फुटून तरुण ठार; 6 जखमी

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Accident News : येथून सिहोरकडे (मध्य प्रदेश) निघालेल्या कारचे अचानक टायर फुटल्याने झालेल्या अपघातात तुकाराम वाडीतील २४ वर्षीय तरुण ठार झाला, तर कारचालकासह इतर पाच जण गंभीर जखमी झाले.

सूरज रामेश्वर जोमाळकर, असे मृत तरुणाचे नाव आहे. (Youth killed in car tire burst in Sendhwa 6 injured Jalgaon Accident News)

तुकारामवाडीतील सूरज जोमाळकर इतर पाच मित्रांसोबत शनिवारी (ता. १५) सकाळी सातच्या सुमारास कारने (एमएच १९, डीजे ७७७३) मध्य प्रदेशातील सिहोरला जाण्यासाठी निघाले. कारमध्ये चालकासह एकूण सात तरुण होते.

सायंकाळी सेंधवा गावाजवळून जात असताना, कारचे टायर फुटल्याने कार उलटली. या अपघातात सूरज जोमाळकर आणि त्याचा मित्र भावेश राक्षे (वय २१) व इतर सर्व गंभीर जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्या सर्वांना जवळच्या एका हॉस्पिटमध्ये हलविण्यात आले. तेथे उपचारादरम्यान सूरज जोमाळकर याचा मृत्यू झाला. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक खोळबंली होती.

मृत सूरज व जखमी झालेल्या तरुणांचे कुटुंब व नातेवाईक रात्री उशीरा सेंधव्याकडे पोचले. तेथे पोचल्यावर सेंधवा पोलिसांकडेकायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली व मृतदेह ताब्यात घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : उड्डाण करताच विमानाच्या इंजिनमध्ये आग, प्रवाशांमध्ये घबराट अन्... पाहा थरारक व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : पुणे शहराचा पाणी पुरवठा आज विस्कळीत

Baby Theft Prevention: बाळाची चोरी रोखणार ‘कोड पिंक’; राज्‍यातील ३५ सरकारी रुग्‍णालयांत प्रणाली लागू, ‘ससून’मध्‍ये सुरू

Ragi Choco Lava Balls Recipe: मुलांसाठी घरच्या घरी बनवा 'रागी चोको लाव्हा बॉल्स', रविवार होईल खास

Panchang 20 July 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

SCROLL FOR NEXT