Youth suicide In Shirsoli jalgaon news esakal
जळगाव

Jalgaon News : आई मुलाला शोधत घरी आली, अन..

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शिरसोली (ता. जळगाव) येथील २३ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. डिगंबर अरुण बारी-खलसे (वय २३, बापूनगर, शिरसोली प्र. बो.), असे मृत तरुणाचे नाव आहे. (Youth suicide In Shirsoli jalgaon news)

डिगंबर अरुण बारी-खलसे मंगळवारी दुपारी गावातच लग्न सोहळ्यात गेला होता. तेथून तो त्याच्या जुन्या घरी अस्वार वाड्यात गेला. तिथे खोलीचा दरवाजा बंद करून छताच्या कडीला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली.

सायंकाळी त्याची आई मुलाचा शोध घेत जुन्या घरी धडकली. तेव्हा दरवाजा आतून बंद होता. आईने आवाज दिला, पण प्रतिसाद मिळेना. दरवाजाही उघडत नसल्याने त्याच्या आईने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तरुणांनी घराचे दार तोडल्यावर डिगंबर छताला दोरी बांधून गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

तत्काळ त्याला खाली उतरवून शासकीय रुग्णालयात नेले. तिथे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन महाजन यांनी तपासणी अंती त्यास मृत घोषित केले. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. डिगंबर याच्या पश्चात लहान भाऊ, दोन विवाहित बहिणी, आई-वडिल असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT